‘यशराज फिल्म’च्या बॅनरखाली ‘बँकचोर’ शिर्षकाच्या चित्रपटात आता ‘कॉमेडी किंग’ कपील शर्मा नसणार आहे. ‘बँकचोर’ या रोमांचक-विनोदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असलेला कपील शर्मा आता या चित्रपटाचा भाग नसणार असल्याचे ‘यशराज फिल्म’च्या वतीने सांगण्यात आले आहे.
यशराज फिल्म आणि कपील शर्मा या दोघांनी काहीकारणास्तव परस्पर हा निर्णय घेतला असून हा चित्रपट कपील शर्मा शिवाय चित्रीत केला जाणार असल्याचे ‘यशराज फिल्म’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यात योग्यवेळी एकत्र काम करणार असल्याचेही यशराज फिल्मने म्हटले आहे.
कपील शर्माने याआधीच यशराज फिल्म बॅनरखालील तीन चित्रपटांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु, बँकचोर चित्रपटाबाबतच्या नव्या बदलांनुसार कपील आणि यशराज फिल्मने एकत्रितरित्या हा निर्णय घेतला असून या चित्रपटाचा कपील शर्मा भाग नसणार असल्याचे यशराज फिल्मने स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2014 रोजी प्रकाशित
‘यशराज फिल्म’च्या ‘बँकचोर’मधून कपील शर्मा ‘आऊट’
'यशराज फिल्म'च्या बॅनरखाली 'बँकचोर' शिर्षकाच्या चित्रपटात आता 'कॉमेडी किंग' कपील शर्मा नसणार आहे.

First published on: 03-07-2014 at 07:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma out of yash raj films bank chor