कपिल शर्मा हा कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो. कपिलने त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कपिल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो त्याचं मतं मांडताना दिसतो. यावरून बऱ्याचवेळा तो ट्रोल होताना दिसतो. यावेळी कपिले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.

कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कपिल म्हणाला, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारताच्या अमूल्य खजिन्याला थेट ऑस्ट्रेलियातून पुन्हा आपल्या देशात आणण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. जय भारत.. हर हर महादेव.” कपिलचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्धी सहन होत नाही, कृपया माझा…”, Viral Video मधील धावणाऱ्या तरुणाची विनंती

या कपिलच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी कपिलच्या पोस्टचं कौतूक केलं आहे. तर काहींनी चक्क म्हटलंय, “पेड ट्वीट”. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, “एकदा भेट तू नक्की. हा तोच आहे ज्यानं ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमाचं प्रमोशन करायला नकार दिला होता आणि आता उगाचच सौजन्याचं नाटक करतोय. सगळं लक्षात ठेवणार आम्ही, पाहातो एकदा तुला”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि मोदी यांच्यातील आभासी शिखर बैठक सोमवारी पार पडली. तत्पूर्वी भारताचा हा पुरातन ठेवा ऑस्ट्रेलियाकडून परत करण्यात आला. २९ पुरातन वस्तू आपण ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून परत मिळालेल्या या वस्तू प्रामुख्याने सहा कलात्मक संकल्पनांवर आधारित आहेत. यात शिव आणि त्याचे गण, शक्तिउपासना, विष्णुअवतार, जैन परंपरा यांच्यासह काही चित्रे आणि २९ कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू नवव्या आणि दहाव्या शतकातील वेगवेगळ्या काळातील आहेत.

आणखी वाचा : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या लेकीची चित्रपटसृष्टीत डॅशिंग एण्ट्री, डान्समध्ये वडिलांनाच दिली टक्कर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वस्तूंच्या निर्मितीत वालुकामय दगड, संगमरवर, कासे, पितळ आणि कागदाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या वस्तू मूळच्या राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल भागातील आहेत.