बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस साजरा केला. किंग खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. शाहरुखचा वाढदिवस आहे म्हणजे चर्चा तर होणारच… असंच वातावरण पाहायला मिळालं होतं. त्याने दरवर्षीप्रमाणे अलिबागच्या फार्महाऊसवर काही खास मित्रमंडळींसोबत त्याच्या वाढदिवसाची पार्टी करत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची सुरुवात केलेली.
आलिया भट्ट, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, फराह खान या साऱ्यांनीच किंग खानच्या अलिबाग फार्महाऊसवर हजेरी लावत त्याच्या पार्टीत कल्ला केला. त्यावेळी शाहरुखने या सेलिब्रिटींचे काही फोटो काढले. शाहरुख फोटो काढत असतानाचे क्षण खुद्द करणनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. पण, शाहरुखने काढलेले ते फोटो अद्याप करणला न दिल्यामुळे करणने थेट ट्विट करतच शाहरुखकडे फोटोंची मागणी केली आहे.
वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’
https://twitter.com/karanjohar/status/927148855543570432
आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शाहरुखने सोशल मीडियावर शेअर करताच करणने त्याला अलिबागच्या फोटोंची आठवण करुन दिली. ‘भाऊ… अलिबागमध्ये काढलेले फोटो दे आता आम्हाला’, असं ट्विट त्याने केलं. त्याच्या या ट्विटला उत्तर देत किंग खाननेही ‘दोन दिवसात तुला फोटो देतो’ असं कबुल केलं आहे. सोशल मीडियावर फक्त चित्रपटाशी निगडीतच ट्विट केले जाता असा जर कोणाचा समज असेल तर शाहरुख आणि करणच्या या टिवटिवीने तो समज दूर झाला असावा. दोन मित्रांमध्ये फोटो न देण्याच्या मुद्द्यावरुन बऱ्याचदा वाद होतात. पण, मैत्रीमध्ये हे सर्व वाद आणि त्यातून निर्माण होणारे काही अविस्मरणीय क्षण या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे शाहरुख आणि करणच्या बाबतीतही हे असंच घडेल हे नक्की. या दोघांच्या नात्यात असणारी सहजता पाहता, दोन दिवसांत शाहरुख करणला अलिबागचे फोटो देतो का, की पुन्हा करण त्याला अशा वेगळ्या पद्धतीने फोटोंबद्दलची आठवण करुन देतो हे पाहावे लागेल.
ok sending them in 2 days.
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 5, 2017