बॉलीवूडमधील आघाडीचा निर्माता करण जोहर आणि एए फिल्मची असणाऱ्या आगामी चित्रपटात सिनेरसिकांना समुद्रातील युद्धाचा थरार पाहायला मिळणार आहे. ‘गाझी अटॅक’ या तेलगू चित्रपटाच्या माध्यमातून भारतातील निर्माते आणि दिग्दर्शक प्रेक्षकांना सागरी युद्धाची रंजकता दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री तापसी पन्नू तेलगूच्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसेल. करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. धर्मा प्रोडक्शन आणि एए फिल्म्स यांनी संयुक्तरित्या बनविण्यात आलेल्या या कलाकृतीचा मला अभिमान असल्याचे करणने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटामध्ये समुद्राच्या तळाखाली रंगलेले युद्ध पाहायला मिळणार आहे. करणने या आगामी चित्रपटाचे पोस्टरदेखील ट्विटरवरुन शेअर केले आहे. ‘गाझी अॅटॅक’ या चित्रपटात एकाहून एक सागरी युद्धाचे थरार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. करण जोहर या आगामी चित्रपटाबाबत फारच उत्सुक आहे. या चित्रपटात काम करण्यापूर्वी तापसीने ‘झुम्मंदी नादाम’, ‘वास्ताडु ना राजू’ आणि ‘मिस्टर परफेक्ट’ या तेलगू चित्रपटात काम केले आहे.

बॉलिवूडमधील ‘पिंक’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नू आता अॅक्शनपॅक चित्रपट करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नाम शबाना’ या तिच्या आगामी चित्रपटात ती गुंडांसोबत दोन हात करताना दिसणार आहे. तापसीने या चित्रपटासाठी अॅक्शनसाठी फार मेहनत घेतली आहे. तेलगु चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये बस्तान बसविलेली तापसी सध्या बॉलिवूडमध्ये चांगली प्रसिद्धी मिळवत आहे. गाझी अटॅक या चित्रपटात मात्र तिची भूमिका छोटी आहे. असे असले तरी या भूमिकेचा स्विकार करताना तिला तसे वाटले नाही. या चित्रपटातील छोट्या भूमिकेसाठीही ती आनंदी आहे असे तापसीने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. चित्रपटातील छोटी भूमिका ही आनंद देणारी असल्याचे ती म्हटले आहे. या चित्रपटामध्ये बाहूबली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता राणा डगुबत्ती देखील दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar did partnership for india first underwater war with aa films
First published on: 05-12-2016 at 15:07 IST