कलर्स वाहिनीवर नुकताच ‘झलक दिखला जा’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. तब्बल ५ वर्षांनंतर हा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमामध्ये रुबिना दिलैक, शिल्पा शिंदे, फैजल शेख, अली असगर, गश्मीर महाजनी, अमृता खानविलकर असे कलाकार सहभागी झाले आहेत. झलक दिखला जा कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वामध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, एव्हरग्नीन अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह नोरा फतेही परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर मनीष पॉल सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे.
‘झलक दिखला जा’ सोबत करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा टॉक शो देखील सुरू आहे. आपल्या शोच्या चित्रीकरणामध्ये गुंतलेला असूनही करण जोहर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही वेळ काढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी करण टेलिव्हिजनवर खूप सक्रीय होता. तेव्हा एका कार्यक्रमामध्ये करीना कपूरने करणला चिडवले होते. ‘माझी आई जे चॅनल लावते त्यावर तिला तू दिसतोस’ असे हसत म्हणत करीनाने करण जोहरची खिल्ली उडवली होती. त्याने झलक दिखला जा, इंडियाज गॉट टॅलेंट, हुनरबाज, इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार अशा रियालिटी शोजमध्ये परीक्षणाचे काम केले आहे. करोना काळात सुरू झालेल्या बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन देखील त्याने केले आहे.
आणखी वाचा- रितेश देशमुख घेणार करण जोहरची फिरकी; Amazon च्या मिनी टीव्हीवरील या कार्यक्रमात करणची हजेरी
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखती दरम्यान करण जोहरने छोट्या पडद्याविषयी मत व्यक्त केले. ‘मी टेलिव्हिजनवर काम करतो, तेव्हा माझी आई खूप आनंदी असते. ती सतत टिव्ही पाहत असते. मी जेव्हाही एखाद्या शोमध्ये सहभागी व्हायचो, तेव्हा ती खूप उत्सुक असायची. माझ्या आईला टीव्हीवरचे रियालिटी शो पाहायला फार आवडतात. माझ्यामुळे तिला पुढे काय होणार आहे हे आधीच माहीत असते. त्यामुळे ती अजून खूश होते. माहिती ही शक्ती आहे असे उगीच थोडी म्हटले आहे.’ असे करणने म्हटले आहे.
आणखी वाचा-पाकिस्तानी क्रिकेटरसह उर्वशीने शेअर केला रोमँटीक व्हिडीओ, नेटकरी म्हणतात…
टेलिव्हिजनवर काम केल्यामुळे करणला ट्रोल केले जाते. मानधनावरुन त्याच्यावर टीका केली जाते. यावर भाष्य करताना तो म्हणाला, ‘जे माझ्यावर टीका करतात ते टीव्हीवर दिसतात का? नाही ना..! म्हणूनच ते माझ्यावर जळत असतात. मी किती मानधन घेतो हे त्यांना कसे कळले? माझ्या मते, पात्र असलेल्यांना त्यांच्या पात्रतेनुसार गोष्टी मिळतात. कोणीही तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवत नाही. मी जेवढं मानधन घेतो ते माझ्या पात्रतेमुळेच घेतो.’