बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आ णि अभिनेत्री काजोल यांची मैत्री सर्वज्ञात आहे. पण सध्या दोघांच्यामध्ये बिनसल्याचे दिसते आहे. बॉलिवूड वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून करण आणि काजोल यांच्या मैत्रीत दुरावा आल्याची चर्चा रंगताना दिसते. मात्र खुद्द करणने काजोलसोबतच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे. आता सर्व संपले आहे. ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. मला वाटते तिलाही हेच हवे आहे. असा उल्लेख करणने त्याच्या आत्मचरित्रामध्ये केला आहे. तसेच करण पुढे लिहीले आहे की, एका वेळी ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, पण तिने माझ्या २५ वर्षाच्या भावनांकडे पाठ फिरवली.

सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, दोघांच्या मैत्रीतील कारण काजोलचा पती आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचीही चर्चा रंगताना दिसते. अजय देवगनचा ‘शिवाय’ आणि करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ दिवाळीच्या मुहूर्तावर २८ ऑक्टोबरला दिवाळीच्या आनंदमयी वातावरणामध्ये अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘शिवाय’ आणि करण जोहरचा बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. यावेळी काजोल पती अजय देवगनला चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये हातभार लावताना दिसली होती. अजयच्याच निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटाकडे अनेकांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ ने बाजी मारली होती. त्यावेळीपासून काजोल आणि करणच्या मैत्रीत दरी निर्माण झाली असल्याचे देखील बोलले जात आहे. यापूर्वीही काजोल आणि करण यांच्या मैत्रीमध्ये दरी निर्माण झाल्याची अनेकदा समोर आले होते. त्यावेळी अजय देवगण याने त्याची पत्नी काजोल आणि चित्रपटसृष्टीतील तिचा खास मित्र करण जोहर याच्या नात्यावरुन पडदा उचलला होता. काही वैयक्तिक कारणांमुळे करण आणि काजोलचे नाते पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही असे अजयने म्हटले होते.

‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ अशा विविध चित्रपटांच्या माध्यमातून काजोलने करणसोबत काम केले आहे. त्यांच्या मैत्रीची चर्चाही सर्वदूर सुरुच असते. पण, सध्या मात्र या दोघांच्या मैत्रीला गालबोट लागल्याचे दिसते.