अभिनेत्री बिपास बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर लवकरच पालक होणार आहे. दोघांच्याही घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा सध्या तिची प्रेग्नेंसी एंजॉय करत असून यासंदर्भातील फोटो ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. दरम्यान, आता करणने पत्नी बिपाशासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. बिपाशा गर्भवती असल्याचं कळाल्यावर काय फीलिंग होती, याबद्दलही करणने खुलासा केला आहे.

करणने मॅटर्निटी फोटोशूटमधील त्याचा आणि बिपाशाचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये करणने लिहिले, “हे असंख्य भावनांचे मिश्रण आहे. सर्व नवीन परंतु ओळखीचं. मी हे यापूर्वी केलंय, असं नाही. पण हे मी माझ्या सर्वात मौल्यवान आणि सर्वात सुंदर स्वप्नात अनुभवलं आहे. हे माझ्या DNA मध्ये आहे, असं वाटतंय. ही एक अशी तीव्र भावना आहे जी मी व्यक्त केली नाही. कारण मला भीती वाटत होती की मी उत्साहात वेगळंच काही तरी करेन.”

पाहा करणची इन्स्टाग्राम पोस्ट –

“मला माझ्यात होणारे बदल जाणवत आहेत. मी गोष्टी समजून घेत त्या आणखी चांगल्या कशा बनवायच्या आणि स्वतःला कसं चांगलं बनवायचं, यासाठी सतत प्रयत्न करत असतो. मला एका स्त्रीमध्ये एक नवा जीव निर्माण करून तिच्या आयुष्याचा भाग बनवत असल्याबद्दल कृतज्ञ वाटतंय,” असं करणने पोस्टच्या शेवटी म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिपाशाने १६ ऑगस्ट रोजी एक पोस्ट करून प्रेग्नेन्सीची घोषणा केली. तेव्हापासून तिच्यावर आणि करणवर बॉलिवूडमधील कलाकार आणि त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.