गेल्या काही दिवसांपासून करिना कपूर खान लवकरचं गोड बातमी देणार असल्याची चर्चा आहे. करिना तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत नुकतीचं लंडनला जाऊन आली. करिनाला मातृत्वाची चाहूल लागल्याने तिचे मन आनंदी राहावे म्हणून सैफ तिला फिरण्यासाठी लंडनला घेऊन गेल्याचे म्हटले जात होते. मात्र, करिनाने या सर्व बातम्या धुडकावून लावल्या आहेत.
इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमने करिनाशी याबाबत संवाद साधला. तू गरोदर आहेस अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे असा प्रश्न करिनाला विचारला असता ती म्हणाली की, मी माझ्या आयुष्याबद्दल नेहमीच खुलेपणाने बोलत आले आहे. जर असं काही असेल तर मी स्वतः सर्वांना याबद्दल सांगेन. मी एक स्त्री आहे आणि कधीनाकधी मी नक्कीच आई होणार. पण सध्या तरी असे काही नाही.
याचा अर्थ तू आता आई होणार नाहीस तर असे म्हटले असता करिना म्हणाली, तुम्ही सर्वजण याबाबत इतकी चर्चा करतायं की आता मी फार उत्सुक झाले आहे. लंडनमध्ये माझी पाच मुलं लपवलेली आहेत, असे खोडकरपणे हसत ती म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2016 रोजी प्रकाशित
लंडनमध्ये माझी पाच मुले लपवलेली आहेत- करिना कपूर
तिचे मन आनंदी राहावे म्हणून सैफ तिला फिरण्यासाठी लंडनला घेऊन गेला होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 10-06-2016 at 12:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor denies pregnancy rumours