सैफ अली खान आणि करिना कपूर खान आपल्या मुलासोबत म्हणजे तैमुर अली खान पतौडीसोबत स्वित्झर्लंड टूरला गेले आहेत. ही तैमुरची पहिली ट्रिप आहे. काही दिवसांपूर्वीचं हे तिघं स्वित्झर्लंडला जाण्यासाठी रवाना झाले. आता त्यांच्या या ट्रिपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये गोंडस तैमुर आपल्या बाबांसोबत त्यांच्या मांडीवर बसलेला दिसतो. तर करिना त्याच्या बाजूला बसली आहे. फोटोत तैमुरच्या चेहऱ्यावरचे हासू खूप सुंदर दिसते. या फोटोतील तैमुरची हेअरस्टाइल थोडी वेगळी आहे.

आसाम पूरग्रस्तांना आमिरकडून २५ लाखांची मदत

याआधीही या ट्रीपमधील तैमुरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सैफने तैमुरला हातात उचलून घेतल्याचं दिसलेलं. स्वित्झर्लंडला सुट्ट्यांचा आनंद घेत असलेल्या सैफ आणि त्याच्या या छोट्या मुलाचा नवाबी अंदाज सध्या अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतोय. सफेद रंगाच्या सूटमध्ये सैफ नेहमीप्रमाणेच जेन्टलमन दिसत असून, त्याच्या हातात असणाऱ्या गोंडस तैमुरच्या चेहऱ्यावरुन कोणाचीही नजर हटत नाहीये. सैफ अली खान बॉलिवूडचा नवाब या नावाने ओळखला जातो हे जरी खरं असलं तरीही त्याच्या नवाबी थाटाला टक्कर देण्यासाठी खुद्द तैमुरच सज्ज झालाय असं म्हणायला हरकत नाही.

आता बाबांसोबत फोटो काढला म्हटल्यावर आईसोबतही एखादा फोटो तर झालाच पाहिजे ना… तैमुरने पांढरी टोपी घातलेला त्याच्या आईसोबतचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. सैफ आणि करिना एकमेकांसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी अनेकदा परदेशात जातात. गेल्यावर्षी २० डिसेंबरला तैमुरला जन्म दिल्यानंतर सैफ आणि करिना कामानिमित्त लंडनला गेले होते.

सैफ त्याचा आगामी सिनेमा ‘शेफ’च्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. तर करिना तिच्या जाहिरातीच्या कामानिमित्त लंडनला गेली होती. करिनाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमात सोनम कपूर आणि स्वरा भास्करसोबत झळकणार आहे. तर सैफ सध्या ‘बाजार’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे.