प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा ७ वा सीझन सुरू झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतो आहे. या शोचे आतापर्यंत तीन एपिसोड प्रसारित झाले आहेत, जे खूपच धम्माल आहेत. केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथचे स्टार्सही या सीझनमध्ये सहभागी होताना दिसतायत आणि आपल्या आयुष्याशी संबंधीत मजेदार खुलासे करत आहेत. आता या शोमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच दिसणार असल्याची चर्चा आहे. पण त्याआधी करीनाची एक इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा स्टायलिश अवतार पाहायला मिळत आहे. तिने ब्लॅक ब्रॅलेट आणि ट्राउझर्स परिधान केले असून त्यावर त्याच रंगाचं ब्लेझर घातलं आहे. मोकळे केस आणि कमीत कमी मेकअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. करीनाच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. पण यासोबतच या फोटोंचं कॅप्शन देखील चर्चेत आहे.

Central Institute of Fisheries Education Mumbai recruitment 2024
CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पाहा अधिक माहिती
HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..

करीना कपूरने हे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मला माझी ब्लॅक कॉफी खूप आवडते.’ यासोबतच तिने काळ्या रंगाच्या हार्ट इमोजीचाही वापर केला आहे. करीनाच्या या कॅप्शनवरून ती लवकरच ‘कॉफी विथ करण ७’मध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. दरम्यान रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी ‘कॉफी विथ करण ७’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या दोघांनी त्यांच्या वैवाहिक आणि सेक्स लाइफबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. याशिवाय सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांचा दुसरा एपिसोडही बराच गाजला होता.

आणखी वाचा- तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर करीना कपूरचे स्पष्टीकरण, म्हणाली “सैफने आधीच…”

आता करिनाच्या या पोस्टनंतर ती पुढच्या आठवड्यात करणच्या शोच्या पाचव्या एपिसोडमध्ये हजेरी लावू शकते असं बोललं जात आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.