“फुलोसा चेहरा तेरा, कलीयोंसी मुस्कान है”, असं म्हणत जिचा १६वं वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा प्रेक्षकांनी ‘अनारी’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अनुभवला, ती अभिनेत्री आज तिच्या लेकीचा सोहळा अनुभवत आहे. होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री करीश्मा कपूरबद्दल.

करीश्माची लेक समायरा आज १६वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या सेलिब्रेशनचे फोटो करीश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करीश्मा आणि तिची मुलगी समायरा मनमोकळेपणाने हसत फोटोसाठी पोझ देत आहेत.


करीश्माने समायराचा लहानपणीचा फोटोसुद्धा तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “तू माझ्यासाठी कायम माझी छोटीशी राजकुमारीच राहशील, १६व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” समायरा ही करीश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मुलगी आहे. त्यांना कियान हा मुलगाही आहे. संजय आणि करीश्मा विभक्त झाले आहेत.

समायराची मावशी म्हणजे करीश्माची बहीण आणि अभिनेत्री करीना कपूर खाननेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ती म्हणते, “तू मला बेबो माँ म्हणतेस त्यालाही एक कारण आहे. जेव्हा तुझी आई तुला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणते त्यावेळी कोणाकडे जायचं हे तुला माहित आहे. खूप मोठी हो, आनंदी राहा आणि निरोगी राहा. आय लव्ह यू अवर फर्स्ट बॉर्न बेबी. हॅप्पी बर्थडे समू.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीश्माने प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने राजा हिंदुस्तानी, जुडवा, बिवी नंबर १ असे अनेक हिट चित्रपट दिले. करीश्मा आणि करीना या दोघी सख्ख्या बहिणी असून रणधीर कपूर आणि बबिता यांच्या मुली आहेत. अभिनेता रणबीर कपूर या दोघींचा चुलत भाऊ आहे.