छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि कलाकारांमधील भांडणामुळे चर्चेत राहणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच सुरू होणार आहे. या शोच्या १६व्या पर्वामध्ये कोणते कलाकार असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय सूना म्हणजेच जिया माणेक आणि रिद्धीमा पंडित या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यांनी अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अशातच आता टीव्हीवरील आणखी एक अभिनेत्री बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मालिका सोडणार असल्याचं कळतंय.

हेही वाचा – टीव्हीवरील ‘या’ दोन लोकप्रिय सूना बिग बॉसमध्ये दिसणार? समोर आली महत्वाची माहिती

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधील एक अभिनेत्री बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं वृत्त समोर आलंय. टीव्ही अभिनेत्री करिश्मा सावंतबद्दल ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये आरोहीची भूमिका साकारत आहे. टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्मा सावंतने बिग बॉस १६ चा भाग व्हावे, यासाठी निर्मात्यांनी तिला ऑफर पाठवली आहे.

हेही वाचा – गौरीला अजिबात आवडत नाही शाहरुखची ‘ही’ सवय; म्हणाली, “त्याच्या या सवयीमुळे पार्टी…”

करिश्मा सावंत आणि बिग बॉसचे निर्माते यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, करिश्मा सावंत बिग बॉसच्या घरात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत करिश्मा सावंत अक्षराच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. शोमध्ये करिश्मा सावंत खलनायक बनून अक्षराला त्रास देते. मात्र, सध्या शोच्या ट्रॅकमध्ये करिश्मा सावंतला फारसे स्थान दिले जात नाहीये, त्यामुळे ती मालिका सोडून बिग बॉसच्या घरात जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याशी घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठमोळी रेशम टिपणीस; दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…

दरम्यान जिया माणेक आणि रिद्धीमा पंडित यांनाही बिग बॉसच्या निर्मात्यांनी ऑफर दिली आहे. त्यानंतर आता करिश्मालाही शोमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल निर्मात्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या तिन्ही टीव्ही अभिनेत्रीपैकी कोणती अभिनेत्री बिग बॉसची ऑफर स्वीकारते, हे शो ऑन एअर झाल्यावरच कळेल.