करिश्मा कपूर आणि करिना कपूर-खान या बॉलिवूडमधील स्टायलिश बहिणी. या दोघी अनेकदा एकत्र पार्ट्यांमध्ये किंवा कौटुंबिक सोहळ्यांमध्ये एन्जॉय करताना दिसतात. दोघींच्या वयात अंतर असले तरी दोघींनी त्यांच्या नात्यात ते कधी जाणवू दिले नाही. आजही त्या एकमेकींच्या सर्वात जवळच्या मैत्रिणी आहेत.

सकाळच्या व्यायामापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेकदा या दोघींना एकत्र पाहिले जाते. करिनाचा आज ३७ वा वाढदिवस. या दिवसाचे औचित्य साधून ‘लोलो’ने अर्थात करिश्मा कपूरने करिनासोबतचा एक ‘थ्रो बॅक’ फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये दोघीही खूपच ‘क्यूट’ दिसत आहेत.

करिना सध्या खूपच बिझी आहे. त्यातून वेळ काढत तिने मुंबई गाठली. ती आजचा दिवस पती सैफ अली खान, मुलगा तैमुर खान आणि कुटुंबीयांसमवेत व्यतीत करणार आहे. तैमुरच्या जन्मानंतरचा करिनाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे करिनासाठी हा वाढदिवस खूप खास असेल यात काही शंका नाही.

https://www.instagram.com/p/BZRlUc3gaWy/

करिना सध्या ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. एकीकडे सिनेमाचे चित्रिकरण आहे, तर दुसरीकडे मुलाचा सांभाळ. या दुहेरी भूमिकेमुळे तिची सध्या तारेवरची कसरत होत असेल. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘कामाला जरी मी प्राधान्य देत असले तरी कुटुंबही माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.