‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कतरिना जखमी झाली आहे.
आगामी ‘बँग बँग’ मधील एका गाण्याच्या सिक्वेन्सचे कतरिना शूटींग करत होती. त्यावेळी हा अपघात घडला आहे. मात्र, कतरिनाची जखम किरकोळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हृतिक रोशन आणि कतरिना यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपटातील एका गाण्यात हृतिक सोबत नाचतांना कतरिनाच्या स्नायू ताणल्याने दुखापत झाली आहे. कतरिना सध्या ‘जग्गा जासूस’ आणि ‘बँग बँग’ या दोन्ही चित्रपटांच्या शूटींग मध्ये चांगलीच व्यस्त आहे. ‘जग्गा जासूस’ मध्ये रणबीर कपूरसोबत कतरिनाने पुन्हा जोडी जमवली आहे.
‘बँग बँग’ हा सिनेमा हॉलीवुडचा हिट ‘नाइट अड डे’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यात टॉम क्रूज़ आणि कॅमरून डियाज यांनी प्रमुख भुमिका निभावल्या होत्या.