अनेक अभिनेत्रींसोबत काम करणा-या अनुष्काने कतरिना ही आपली आवडती सहकलाकार असल्याचे म्हटले आहे. तसेच, बॉलीवूडमध्ये असलेल्या कॅट-फाइट या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचेही तिचे म्हणणे आहे.
एक अभिनेत्री म्हणून आपण कॅट-फाइटसारख्या गोष्टी संपवून टाकण्याची गरज आहे. क्वीन पाहिल्यानंतर मी कंगनाला फोन केला. कॉकटेल बघितल्यावर दिपीका पादुकोणलाही मी फोन केला होता. चित्रपटातले त्यांचे काम पाहून मी खूप उत्साहित झाले होत, असे अनुष्का म्हणाली. त्यानंतर तिची आवडती सहकलाकार कोण असे विचारले असता ती म्हणाली की, कतरिना कैफ माझी आवडती सहकलाकार आहे. तिच्याशी माझे मैत्रीचे चांगले संबंध आहेत. ‘जब तक है जान’च्या वेळी आम्ही खूप चांगला वेळ एकत्र व्यथित केला.
अनुष्काचा एनएच १० हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2015 रोजी प्रकाशित
कतरिना माझी आवडती सहकलाकार- अनुष्का
अनेक अभिनेत्रींसोबत काम करणा-या अनुष्काने कतरिना ही आपली आवडती सहकलाकार असल्याचे म्हटले आहे.

First published on: 02-01-2015 at 04:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif is my favourite co star anushka sharma