बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या डाइटचे रहस्य खोलले आहे. चित्रपटांच्या मागणीनुसार मी माझा डाइट आणि फिटनेस प्लॅन ठरवते, असे कतरिनाने म्हटले.
मला काय साध्य करायचंय, मी कोणत्या प्रकारचा चित्रपट करतेय यावर माझं डाइट आणि फिटनेस अवलंबून असतं. चित्रपटाची मागणी कोणत्या प्रकारची आहे, अगदी साधी भूमिका आहे, की ग्लॅमरस किंवा अॅथलेटिक लूक हवा त्यानुसार डाइट सुरु करायचा, असं कतरिना म्हणाली. पुढे ती म्हणाली की, मी अगदी साधसरळ खाणं खाते. आरोग्यासाठी कोणतं खाद्य योग्य आहे हे आपल्याला माहितचं असतं. फिटनेस स्पेशालिस्ट यास्मिन कराचीवाला आणि झिना ढल्ला यांच्या ‘स्कल्प्ट अॅण्ड शेप’ पुस्तकाचे नुकतेच अनावरण झाले. त्यावेळी कतरिना बोलत होती.
कतरिना आणि सैफ अली खानचा ‘फॅण्टम’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार आहे.