अभिनेत्री कतरीना कैफ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या सेटवरचे प्रत्येक दिवसाचे नवनवीन फोटो ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती हसत असतानाचा आणि त्याचवेळी सलमान खान लाजतानाचा फोटो शेअर केला. ‘सलमानसोबतच्या या फोटोबद्दल काही लिहायची गरज नाही,’ असं अनोखं कॅप्शन कतरिनाने या फोटोला दिलं. ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये सध्या दोघं व्यग्र आहेत. दोघेही पाच वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सुमारे पाच वर्षांनंतर हे दोघं एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. अली अब्बास झफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा ‘एक था टायगर’ या सिनेमाचा सिक्वल आहे. हा सिनेमा कबीर खानने दिग्दर्शित केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनी लिओनीच्या मुलीने उच्चारलेला पहिला इंग्रजी शब्द!

न्यूयॉर्कमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्यावेळीही साऱ्यांच्या नजरा सलमान आणि कतरिनावर खिळल्या होत्या. सलमानने त्याच्या परफॉर्मन्सवेळी कतरिनाकडे पाहत ‘झोया काळजी करु नकोस टायगर अजून जिवंत आहे,’ असे म्हटले होते. कतरिनानेदेखील एका मुलाखतीत सलमानचे कौतुक करत म्हटले होते की, ‘सलमान फार प्रेमळ असून, तो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून येतो. पण माझ्यासाठी तो सर्वात मोठी ताकद आहे. तो माझ्यासाठी वेगळं असं काही करत नाही. पण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि अथक परिश्रम करण्यासाठी तो नेहमीच मला प्रोत्साहित करतो.’

‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या चित्रीकरणानंतर कतरिना आगामी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या उर्वरित चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या सिनेमात ती आमिर खान आणि अमिताभ बच्चन या दिग्गजांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमात ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif shared a picture with salman khan on instagram and actor was seen blushing
First published on: 27-07-2017 at 17:12 IST