गुजरातच्या सुरतमधून ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या पर्वाची सुरुवात केल्यानंतर आता या शोची परदेशवारी हेण्याचे संकेत महानायक आणि प्रश्नमंजुषेवर आधारित या शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी दिले आहेत. दरवेळेस स्टुडिओमध्ये चित्रीत होणारा हा शो पहिल्यांदाच मुंबईतील स्टुडिओच्या बाहेर घेऊन जाणारे अमिताभ बच्चन यांनी सदर शो जागतिक पातळीवर नेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सूतोवाच केले. या विषयी अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगवर लिहितात, दुसऱ्या शहरांमध्ये जाण्याची इच्छा आणि योजना आहे… मिडल इस्ट, यूके आणि यूएसए… या देशांच्या नावाची चर्चा माझ्या कानावर येत आहे. अन्य गोष्टी जशा कानावर येतात त्याचप्रमाणे ही देखील असण्याची शक्यता आहे. सोनी वाहिनीवर दिनांक १७ ऑगस्टपासून केबीसी-८ला सुरुवात होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun banega crorepati to travel to us uk next
First published on: 05-08-2014 at 04:15 IST