अभिनेत्री कविता कौशक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा कविता तिच्या बोल्ड फोटोंमुळे देखील चर्चेत आली आहे. नुकतच कविताने एक फोटोशूट केलंय. कविताने तिचा एक खास फोटो ट्वीटरवर शेअर केलाय. कविताने या पोस्टमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला देखील टॅग केलंय. तर कविताच्या या फोटोवर उर्मिलाने देखील कमेंट करत पसंती दिलीय.

कविताने ट्विटरवर एक सुंदर फोटो शेअर केलाय. यात ती निसर्गाच्या सानिध्यात एका दगडावर उभी राहिलेली दिसतेय. फोटोत तिने एक सुंदर डान्स पोज दिली आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “मला माहितेय खरं तर ही पोज देताना मी जप करायला हवा होता. पण माझ्या डोक्यातून ‘हाय रामा ये क्या हुआ’ हे गाणं जातचं नव्हत. कारण मी उर्मिलाची कायमच चाहती आहे.” असं म्हणत तिने उर्मिलाल टॅग केलं.

“फालतू आणि मूर्खपणा करू नका, हा कुणाच्यातरी आयुष्याचा प्रश्न आहे”; आर्यन खानच्या अटकेवर कुब्रा सैतची प्रतिक्रिया


यावर कविताला उर्मिला मातोंडकरने “जबरदस्त” अशी कमेंट देत हार्टचं इमोजी शेअर केलंय. तसचं अनेक चाहते आणि नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत कविताच्या फोटोला पसंती दिलीय. एक नेटकरी म्हणाला, “हा फोटो पेटिंगसारखा वाटतोय.” तर अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

“कृपा करून हा मूर्खपणा थांबवा”; ‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर अनुषाची पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कविताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील बिकिनीतील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. कविताने FIR या मालिकेत ‘चंद्रमुखी चौटाला’ ही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसचं अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे.