कन्नड सुपरस्टार यशचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट एका मागोमाग एक नवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील यशचे डायलॉग सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. खासकरून त्याची व्यक्तिरेखा रॉकी भाईचा ‘वायलेन्स वायलेन्स’ हा डायलॉग खूपच लोकप्रिय झाला आहे.
यशच्या या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन सध्या बरंच गाजतंय. यासाठी यशच्या व्यक्तिरेखेला मराठमोळा वॉइसओव्हर आर्टिस्ट सचिन गोळेनं आवाज दिला आहे. सचिन मागच्या १७ वर्षांपासून डबिंगचं काम करत आहे. त्यानं याआधीही बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांसाठी आवाज दिला आहे. नुकत्याच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सचिननं ‘केजीएफ २’ बाबत बरेच रंजक खुलासे केले आहेत. सचिननं केजीएफच्या पहिल्या भागासाठीही डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं आणि त्याची निवड स्वतः यशनं केली होती.

आणखी वाचा- ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीआधी अभिनेत्रीनं केला डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

dd news new logo
“DD चं आता भगवीकरण झालंय”, लोगोचा रंग बदलल्यावरून माजी CEO चा हल्लाबोल; म्हणाले, “प्रसार नव्हे, प्रचार भारती!”
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

यशला हिंदी भाषेत प्रदर्शित करायचा नव्हता KGF
सचिन म्हणाला, “केजीएफ हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित व्हावा असं त्यावेळी यशला वाटत होतं. पण त्यानंतर बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनला एवढी लोकप्रियता मिळाली की यशनं आपले विचार बदलले आणि तो हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यास तयार झाला. पण प्रश्न हा होता की यशच्या व्यक्तिरेखेला आवाज कोण देणार. त्यांना अशा आवाजाची गरज होती जो जास्त भरदस्त पण नसेल आणि जास्त सॉफ्ट देखील नसेल तसेच टिपिकल मुंबईकरांसारखे हिंदी उच्चार असतील. मी अगोदर यशच्या काही चित्रपटांना आवाज दिला होता. हे चित्रपट त्याने पाहिले, त्याला माझा आवडला आणि मग त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. त्यानंतर माझंच नाव हिंदी व्हर्जनच्या डबिंगसाठी फायनल करण्यात आलं.”

किती वेळात झालं KGF 2 चं डबिंग?
KGF 1 च्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. त्यामुळे दुसऱ्या भागासाठीही सचिन गोळेला फायनल करण्यात आलं. तो म्हणाला, “तसं तर मेकर्सनी मला सांगितलं होतं की जेव्हा पण तुला वेळ मिळेल तेव्हा तू याचं डबिंग कर पण मला माहीत होतं की हे काम मलाच करायचं आहे आणि त्यातही मला सर्वोत्कृष्ट काम करायचं आहे. असं नाही की डबिंग फार कमी वेळात पूर्ण झालं. पण जिथे मला ४-५ तासांचा स्लॉट मिळतो तिथे मी केजीएफच्या डबिंगसाठी पूर्ण एका आठवड्याचा वेळ घेतला. चूक करण्याची एकही संधी नव्हती कारण मी मुख्य भूमिकेचं डबिंग करत होतो.”

आणखी वाचा- बाळासाहेब आणि आनंद दिघेंची ‘मातोश्री’वरील गुरुपौर्णिमा; ‘धर्मवीर’चं गाणं पाहून येईल डोळ्यात पाणी

दरम्यान सचिन गोळेनं फक्त यशसाठीच नाही तर इतर बऱ्याच दाक्षिणात्य कलाकारांसाठी आवाज दिला आहे. त्यानं अभिनेता धनुषचे बरेच चित्रपट हिंदी भाषेत डब केले आहेत. याशिवाय त्यानं रजनीकांत यांचे जुने चित्रपट, संदीप किशन, दुलकर सलमान यांसारख्या कलाकारांनाही आवाज दिला आहे. सचिन केवळ डबिंग आर्टिस्टच नाही तर एक उत्तम अभिनेताही आहे.