छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस १३’ या शो नंतर आता ‘खतरों के खिलाडी पर्व १०’ चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. पण सर्वात जास्त चर्चा पाहुणा स्पर्धक भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाच्या सुरु आहेत. हर्ष अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत सतत मस्ती करताना दिसतो. नुकताच शोदरम्यान हर्षने करिश्माला दुसऱ्या लग्नासाठी प्रपोज केले आहे.

हर्ष आणि करिश्मा शोमध्ये टास्कसाठी एकत्र परफॉर्म करत असतात. या टास्कमध्ये करिश्माला तीन ते चार टप्पे पार करुन एका विशिष्ठ उंचीवर बसलेल्या हर्षपर्यंत पोहोचायचे असते. टास्क कमी वेळात पूर्ण करण्यासाठी हर्ष तिला प्रोत्साहन देत असतो. दरम्यान त्याने करिश्माला लग्नासाठी प्रपोज केले आहे. ‘माझे दुसरे लग्न तुझ्याशीच होणार’ असे हर्ष म्हणतो. ते ऐकून खाली उभे असलेले सर्व स्पर्धक हसू लागतात. हर्षने करिश्माला प्रपोज करणे हा केवळ एक कॉमिडीचा भाग होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर करिश्मा सर्व टप्पे पार करुन हर्षपर्यंत पोहोचतो. तेव्हा हर्ष पुन्हा ‘माझे दुसरे लग्न तुझ्याशीच होणार, कम टू मी बेबी करिश्मा’ असे म्हणतो. त्यावर रोहित शेट्टी हर्षला ‘भारती तुला मारेल’ असे म्हणतो. ते ऐकून करिश्मादेखील मस्ती करताना दिसते. ‘भारती, हर्ष फक्त माझा आहे’ असे हसतहसत करिश्मा बोलू लागते.