scorecardresearch

Premium

कियाराला स्वतःचा ड्रेसही सांभाळता येईना, बोल्ड लूक झाला कॅमेऱ्यात कैद

अभिनेत्री कियारा अडवाणीचा स्टायलिस्ट ड्रेसमधील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

kiara-dress-look
अभिनेत्री कियारा अडवाणीचा स्टायलिस्ट ड्रेसमधील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

कियारा अडवाणी सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. मात्र या सगळ्या अफवांकडे हे दोघंही पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दोघंही आपल्या नात्याबाबत मौन पाळणंच पसंत करतात. सध्या कियारा तिचं खाजगी आयुष्य अगदी एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा फॅशन सेन्स फारच कमालीचा आहे. आपला प्रत्येक लूक अगदी परफेक्ट असावा असं तिला वाटतं. फॅशनच्याबाबतीत वेगवेगळे प्रयोग करणं तिला पसंत आहे. मात्र यावेळी तिने फॅशनच्याबाबतीत केलेला प्रयोग पूर्णपणे फसला.

कियारा नुकतीच जीक्युच्या(GQ) रेड कार्पेटवर एकदम स्टायलिस्ट अंदाजात दिसली. पण यावेळी तिने रेड कार्पेटसाठी जो ड्रेस निवडला होता तो काही वेगळाच होता. हा ड्रेस तिच्यासाठीच अडचण निर्माण करणारा ठरला. याचदरम्यानचे कियाराचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कियाराने हाय स्लिट कट ड्रेस परिधान केला होता. मात्र हा ड्रेस ती सतत सांभाळताना दिसत होती. इतकंच नव्हे तर फोटोसाठी पोझ देणंही तिच्यासाठी अवघड झालं होतं.

passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
Startup Valuation Many Other Types
Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?
kangana-abu-salem
कंगना रणौत कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत
MS Dhoni dancing in front of Sakshi
MS Dhoni: माहीने ‘देसी बॉयज’मधील ‘झक मार के’ गाण्यावर साक्षीसमोर धरला ठेका, मजेशीर डान्सचा VIDEO होतोय व्हायरल


या नव्या लूकमध्ये ती अधिक आकर्षक जरी दिसत असली तरी ड्रेस निवडीबाबत तिचं गणित यावेळी मात्र बिघडलं होतं. कियारा तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत नवनवीन लूकमधील फोटो पोस्ट करताना दिसते. तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत. पण ड्रेसनिवडीबाबत आपणही कधीतरी फसतो. यावेळी कियाराचंही अगदी तसंच झालं.

आणखी वाचा – स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसली प्रियांका, पाहा हा VIRAL व्हिडीओ

कियारा तिच्या कामाकडे सध्या अधिकाधिक लक्ष देताना दिसत आहे. कार्तिक आर्यनबरोबर ‘भुल भुलैय्या २’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दोघंही या चित्रपटाचं अगदी जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kiara advani face oops moment and her bold look video viral on social media after breakup kmd

First published on: 30-04-2022 at 10:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×