‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटातल्या शाहिदच्या भूमिकेसोबतच कियाराच्या भूमिकेचही खूप कौतुक झालं. आता कियारा अडवाणी ‘शेरशहा’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातदेखील ती दिसणार आहे.

कियाराने आताच तिने सिनेसृष्टीतील करियर सुरु केले आहे. करीना कपूरसोबत काम करण्याविषयी तिला विचारले असता ती म्हणाली की, “मी लहानपणापासून करीनाचे चित्रपट बघत आले आहे. तिच्यामुळेच मला अभिनेत्री व्हावेसे वाटले. करीना गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. प्रत्येक चित्रपटातील तिची भूमिका जसा वेळ जातोय तशी अधिकच प्रगल्भ होतेय.”

“मी करीनाला कधीही पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिने ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटामध्ये केलेली व्यक्तिरेखाच येते. तिचे संवाद माझ्या डोक्यात अजूनही आहेत. माझ्यासाठी ती ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटातील पूजाच आहे. त्या चित्रपटात तिचा एक डायलॉग आहे, “तुम्हे कोई हक नही बनता की तुम इतनी खूबसूरत लगो” मला असं वाटतं की, हा डायलॉग तिच्यासाठी लिहिला आहे. ती अतिशय सुंदर आहे. तिच्यामुळेच मला अभिनेत्री व्हावंसं वाटलं” असंही कियारा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कियारा ‘शेरशहा’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.