मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटाला खूप मोठी गर्दी व्हावी यासाठीच्या मोठ्या प्रयत्नांसाठी कोणत्या नवीन कल्पना कशा आणि का सुचतील याचा विचार आपण का करायचा. त्यापेक्षा जे जे काही चाललय ते पाहयचे. याचेच एक उदाहरण बालप्रेक्षकांसाठीच्या ‘किड क्रिश’चे… अर्थात राकेश रोशन दिग्दर्शित ‘क्रिश ३’च्या पूर्व प्रसिध्दीचा भाग म्हणून हा सगळा खटाटोप. ‘क्रिश ३’ अर्थात हृतिक रोशन सिनेमात सुपर मॅनच्या रुपात थरारक आणि अतिशोयोक्तीपूर्ण साहस दाखवणार आहे. त्याच्याशी बालप्रेक्षक जोडला जावा यासाठी तर ‘किड क्रिश’ या अॅनिमेशनपटाची निर्मिती झाली आहे. दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता कार्टून नेटवर्कवर हा अॅनिमेशनपट प्रेक्षेपित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘क्रिश ३’ पूर्वी ‘किड क्रिश’
मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटाला खूप मोठी गर्दी व्हावी यासाठीच्या मोठ्या प्रयत्नांसाठी कोणत्या नवीन कल्पना कशा आणि का सुचतील याचा विचार आपण का करायचा.

First published on: 24-09-2013 at 06:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kid krrish to promote krrish 3 among kids