सोशल मीडियावर अनेक मराठी गाणी ट्रेंड होतं असतात; ज्याचे रील्स तुफान व्हायरल होतात. सध्या नेटकऱ्यांना संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने वेडं लावलं आहे. एवढंच नाहीतर माधुरी दीक्षित, रेमो डिसुझा यांच्यासह अनेक कलाकार मंडळींना या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावर अनेक जण रील करताना दिसत आहेत. अशातच टांझानियाच्या किली पॉलच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने चक्क ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

किली पॉल हे सोशल मीडियावरील लोकप्रिय नाव आहे. टांझानियाचा किली नेहमी त्याच्या रीलमुळे खूप चर्चेत असतो. धाकटी बहीण नीमा पॉलबरोबर तो अनेकदा रील करत असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर मिलियनमध्ये फॉलोवर्स आहेत. अशा या लोकप्रिय रीलस्टारने नुकतंच ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं गायलं; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किलीचं मराठी ऐकून नेटकरी थक्क झाले असून त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – “वेगळा प्रवास, वेगळी भूमिका अन्…”, सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर विशाखा सुभेदारची खास पोस्ट; म्हणाली…

किलीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुझं मराठी सई ताम्हणकरपेक्षा चांगलं आहे भावा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “किली भावा महाराष्ट्रात ये आधार कार्ड काढू या….” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुझं मराठी माझ्या एका महाराष्ट्रीयन मित्रांपेक्षा चांगलं आहे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “जे लोकं महाराष्ट्रात राहून म्हणतात ना मला मराठी नाही येत. त्यांच्या तोंडात चपल मारलीस भावा.”

हेही वाचा – Video: ‘साधी माणसं’नंतर ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची घोषणा, पूजा बिरारी-विशाल निकमसह ‘हे’ कलाकार झळकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी किली पॉलने अनेक मराठी गाण्यावर रील्स केली होती. ‘चोरु चोरून’, ‘मधुमास’ या मराठी गाण्यांवर किलीने बहीणबरोबर रील केली होती. याशिवाय त्याचं ‘गाव सुटना’ या गाण्यावरील रील तुफान व्हायरल झाली होती.