सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’ ही मालिका अनेक प्रेक्षक नित्यनेमाने बघत असल्यामुळे त्याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रेक्षकांना त्यातील साधेपणा भावतो आणि साई बाबांची शिकवण प्रत्यक्ष पडद्यावर बघणे ही प्रेक्षकांसाठी एक दृश्य मेजवानीच आहे. केवळ प्रेक्षकांच्या अतीव प्रेमामुळेच या मालिकेने नुकताच 400 एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे. मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध चेहरा, किशोरी गोडबोले हिला ‘मेरे साई’ मालिकेत बायजा माँ ची भूमिका रंगवण्यासाठी घेण्यात आले आहे. चित्रपट आणि रंगमंच क्षेत्रात व्यस्त असलेली, किशोरी जवळजवळ 3 पेक्षा जास्त वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

किशोरीशी संपर्क साधला तेव्हा ती म्हणाली, “मी आणि माझे आई बाबा साई बाबांचे निःसीम भक्त आहोत आणि जेव्हा बायजा माँ ची भूमिका करण्यासाठी मला विचारणा झाली तेव्हा तो साई बाबांचा आशीर्वादच आहे असे मला वाटले. जेव्हा ‘मेरे साई’ च्या टीमने मला ऑडिशनसाठी बोलावले, तेव्हा मी अतिशय उत्साहित झाले होते. बायजा माँ एक अतिशय कणखर स्त्री होती आणि त्या काळात हक्कांसाठी ती खंबीरपणे उभी राहत असे, साई बाबांवर तिची अढळ श्रद्धा होती आणि आमच्यामध्ये हाच भक्तीचा समान धागा होता. शिवाय, मालिकेचा दिग्दर्शक सचिन आंब्रे याच्याबरोबर या आधी सुद्धा काम केलेले असल्यामुळे पुन्हा त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळीच सहजता आणि आत्मविश्वास जाणवतो. मालिकेतील या भूमिकेत काही चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे. बाबांच्या आशीर्वादाने बायजा माँच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील, असा मला विश्वास वाटतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आगामी कथानकात चिऊला लग्नासाठी मागणी घालून विधवांच्या बाबतीतील कठोर रितीरिवाजापासून तिला सोडवण्याचे श्रीकांतचे प्रयत्न प्रेक्षकांना दिसतील. ‘मेरे साई’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.