५० कोटींचा प्लॅट, दीड कोटींचे ब्रेसलेट, सलमान खाननेही दिली दीड कोटींची कार? आथिया-केएल राहुलवर भेटवस्तूंचा पाऊस! | kl rahul athiya shetty for bmw car bracelet gifts from salman khan ms dhoni virat kohli | Loksatta

५० कोटींचा फ्लॅट, दीड कोटींचे ब्रेसलेट, सलमान खाननेही दिली दीड कोटींची कार? अथिया-केएल राहुलवर भेटवस्तूंचा वर्षाव!

मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा होती.

k l rahul and athiya shetty gifts
अथिया शेट्टी, केएल राहुल (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा होती. त्यांनी खंडाळा येथे २३ जानेवारी रोजी नुकतेच लग्न केले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून या विवाहासाठी तयारी केली जात होती. दरम्यान, या विवाहानंतर अथिया आणि केएल राहुल या जोडीला अनेकजण भेटवस्तू देत आहेत. अभिनेता अनिल कपूर, सलामान खान, जॉकी श्रॉफ यांच्यापासून ते क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी या नव्या जोडीला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >> Photos: तमन्ना भाटियाने कॉपी केला शिल्पा शेट्टीचा लूक? डबल टोन डेनिम जीन्समुळे झाली ट्रोलर्सची शिकार

सलमान खानने दिली १.६४ कोटींची कार

अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी या नव्या जोडीला मुंबईत एक आलिशान फ्लॅट भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. या फ्लॅटची किंमत ५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. तर सलामन खानने अथियाला तब्बल १.६४ कोटी रुपयांची कार गिफ्ट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. अभिनेता जॉकी श्रॉफनेदेखील ३० लाख रुपयांचे घड्याळ तर अभिनेता अनिल कपूरने १.५ कोटी रुपयांचे ब्रेसलेट भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >> घरात हटके वस्तू, बाहेर हिरवंगार लॉन…; अथिया-राहुलचा लग्नसोहळा होणाऱ्या सुनील शेट्टींच्या आलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल

विराटने दिली २.१७ कोटी रुपयांची ऑडी

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूंनीदेखील या नव्या जोडीला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने केएल राहुलला २.१७ कोटी रुपयांची ऑडी कार भेट म्हणून दिली आहे. तर एमएस धोनीने राहुलला ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक गिफ्ट दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 23:39 IST
Next Story
मुंबई : फसवणुकीच्या २० लाख रुपयांच्या रकमेसाठी राकेश रोशन उच्च न्यायालयात