मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे Prarthana Behere नाव न चुकता घेतले जाते. या सौंदर्यवर्ती अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाने ती लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. तत्पूर्वी, प्रार्थनाचे नाव अभिनेता वैभव तत्ववादी याच्याशी जोडले जात होते. ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपटात झळकलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असे अनेकांना वाटत होते. मात्र, आपण ‘अरेन्ज मॅरेज’ करत असल्याचे प्रार्थनाने एका मुलाखतीत सांगितल्याने अनेकांनाच धक्का बसला. या महिन्यात प्रार्थना साखरपुडा करणार असून, तिच्या भावी नवऱ्याचे नाव अभिषेक जावकर Abhishek Jawkar असे आहे. प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री असल्याचे आपल्याला माहित आहे. पण तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल.

विवाह मंडळाच्या माध्यमातून प्रार्थना आणि अभिषेक यांचे लग्न ठरले. त्यांचा साखरपुडा याच महिन्यात होणार असून, १४ नोव्हेंबरला ते लग्नबंधनात अडकतील. ‘आम्ही डेस्टिनेश वेडिंग करण्याच्या विचारात असल्याचे’, प्रार्थनाने मुलाखतीत सांगितलेले.

अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

प्रार्थनाच्या या भावी जोडीदाराला फिरण्याची आवड असून त्याला वाइनही आवडते.

अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले. तेथूनच चित्रपटांच्या रिळी खरेदी करण्यापासून त्याचा प्रवास सुरु झाला. यानंतर त्याने फॉक्स एण्टरटेंमेन्ट आणि हिस्टरी वाहिनीसाठी माहितीपट तयार करण्यास सुरुवात केली.

अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले असून, तो तेथे यशस्वीही ठरला. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलीये. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही त्यानेच केले.

जवळपास दोन वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. ‘डब्बा ऐस पैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केलीये.

‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो आता दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनात गुंतल्याचे समजते.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Jawkar (@abhishekjawkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.