‘कोरिओग्राफरने २० मॉडेल्स समोर मला…’, मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी क्रितीने केला खुलासा

क्रितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगितले आहे.

Kriti Sanon, Kriti Sanon instagram,
क्रितीचा 'मिमि' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती गेल्या काही दिवसांपासून ‘मिमि’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत होती. प्रत्येक अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागतो तसा संघर्ष क्रितीला ही करावा लागला आहे. मॉडेलिंगच्या सुरुवातीला पहिल्या रॅम्प वॉकच्यावेळी कोरिओग्राफरने तिला २० मॉडेल्ससमोर फटकारले होते असे क्रितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

क्रितीने नुकतीच ‘ब्रुट इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी क्रितीने हा खुलासा केला आहे. ‘जेव्हा मी माझा पहिला रॅम्प शो केला, तेव्हा मी कोरिओग्राफीमध्ये थोडी गडबड केली होती. त्यानंतर शो संपला आणि कोरिओग्राफने २० मॉडेल समोर मला फटकारले. जेव्हा कोणी मला ओरडतं किंवा फटकारतं तेव्हा मी लगेच रडू लागते,’ असे क्रिती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

आणखी वाचा : व्हर्जिनिटी ते कार सेक्स; ‘या’ सेलिब्रिटींनी त्यांच्या सेक्स लाईफवर केले होते उघडपणे वक्तव्य

पुढे क्रिती म्हणाली, ‘मला आठवतंय की मी एका ऑटोमध्ये बसले होते आणि ज्या क्षणी मी ऑटोमध्ये बसले, तेव्हा मी लगेच रडू लागले. मी घरी परतले आणि मी माझ्या आईजवळ जाऊन पुन्हा रडू लागले. त्यावेळी माझी आई मला म्हणाली, तू यात काम करू शकते किंवा हे करिअर तुझ्यासाठी आहे की नाही याची कल्पना मला नाही. तुला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होण्याची गरज आहे. तुला एका जाड कातडीची व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यासोबत आत्मविश्वास असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी मी काही वेळाने मिळवली.’

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

क्रितीचा ‘मिमि’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता क्रितीने ‘बच्चन पांडे’चे चित्रीकरण संपवले आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. यानंतर क्रिती टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. एवढंच नाही तर ती ‘भेडीया’ आणि ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kriti sanon speak about her modelling days and her first ramp walk dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या