scorecardresearch

सगळीकडे ट्राय का करतोस? केआरकेने रणबीर कपूरच्या चारित्र्यावर केला प्रश्न

केआरकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणबीरला हा प्रश्न केला आहे.

krk questioned ranbir kapoors character
केआरकेने रणबीर कपूरच्या चारित्र्यावर केला प्रश्न
अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगने त्याला ट्रोल केले होते. यानंतर केआरकेने अनेक कलाकारांवर टीक केली. आता केआरकेने रणबीर कपूरवर निशाना साधला आहे. केआरकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणबीरच्या चारित्र्यावर प्रश्न केला आहे.

केआरकेचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. “आजकाल रणबीर कपूर दीदी कंगना रणौतच्या निशाण्यावर आहे. कंगना हळू हळू इशारा देत रणबीर कपूरची पोल खोलते आहे आणि संपूर्ण जगाला सांगते की रणबीर कपूर किती वाईट आहे. मला रणबीरला हे सांगायचं आहे की सगळीकडे ट्राय का करतोस?,” अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

आणखी वाचा : सीतेच्या भूमिकेसाठी मानधनाची रक्कम वाढवलेल्या करीनाची पाठराखण करत तापसी म्हणाली…

krk questioned ranbir kapoors character
केआरकेने रणबीर कपूरच्या चारित्र्यावर केला प्रश्न

आणखी वाचा : स्वत: वरचं मीम शेअर करत अभिषेकने दिली नेटकऱ्यांना शिकवण

आणखी वाचा : ‘जेठालाल कडून चूर्ण घ्या’, नेटकऱ्याने दिग्दर्शकाला दिला सल्ला

काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या वयावर विनोद केला होता. या आधी केआरकेने बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतवर निशाना साधला होता. केआरके म्हणाला की कंगना तिच्या आयुष्यातील १२ वा फ्लॉप चित्रपट देणार आहे. त्याने आधीच कंगनाच्या विरोधात ट्वीट करत तिच्या आगामी चित्रपटाला फ्लॉप आहे असे म्हटले आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Krk questioned ranbir kapoors character by asking him why you try at everyone dcp