“लोकांना बिकिनीतील फोटो चालतो, स्तनपानाचा फोटो टाकला तर केवढा ड्रामा”; ट्रोलर्सना अभिनेत्रीचं उत्तर

अभिनेत्री शिखा सिंह गेल्या काही दिवसांपासून तिच्या टॉपलेस आणि स्तनपानाच्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

shikha-singh
(Photo- Instagram@shikhasingh)

‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री शिखा सिंह गेल्या काही दिवसांपासून तिच्या टॉपलेस फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतेच शिखाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोत शिखाचा टॉपलेस बोल्ड लूक पाहायला मिळत होता. तर दुसऱ्या फोटोत शिखा तिच्या मुलीला स्तनपान करताना दिसून येत होती. या दोन्ही फोटोंमुळे शिखाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होतं.

या फोटोंमुळे ट्रोल झाल्यानंतर आता शिखा सिहने तिचं मौन सोडलं आहे. शिखाने टॉपलेस फोटो का शेअर केला होता याचा खुलासादेखील केलाय. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शिखा म्हणाली, ” मी या आधीदेखील एकदा स्तनपानाचा फोटो शेअर केला होता तेव्हाही लोकांनी माझ्यावर निशाणा साधला होता. पहिली गोष्टी अशी की मला लोकांच्या कमेंट आणि ते काय विचार करतात याचा फरक पडत नाही. दुसरी गोष्टी स्तनपानासारख्या गोष्टीला मला समाजात एक नॉर्मल गोष्ट बनवायची आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत मी माझ्या मुलीला दूध पाजताना दिसतेय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikha Singh Shah (@shikhasingh)

हे देखील वाचा: स्तनपानाच्या फोटोनंतर अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो; नेटकरी म्हणाले, “तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती”

पुढे ती म्हणाली, “माझा स्तनपानाचा फोटो अशा अँगलने घेतलाय की  त्यात बाळ सुद्धा दिसत नाहीय. लोकांना बिकिनीतील फोटो चालतो मात्र मी स्तनपानाचा फोटो टाकला तर केवढा ड्रामा. लोकांनी त्या फोटोला न्यूड म्हंटलं मात्र तो न्यूड नाहीय.” असं शिखा म्हणाली. या फोटोवरील कमेंटमुळे मी सुरुवातीला त्रस्त होते असं शिखा म्हणाली. “अनेकांनी तुझा पती असे फोटो कसे शेअर करू देतो अशी कमेंट केली होती. मात्र माझ्या पतीनेच माझा हा फोटो काढलाय.” असं म्हणत शिखाने या नेटकऱ्यांची बोलती बंद केलीय.

हे देखील वाचा: “तुम्ही ज्या सईवर ही प्रेम करता ती चोर आहे”… कपडे लपवल्याने गौतमीवर बहीण मृण्मयी देशपांडे चिडली

शिखाने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना या मुलाखतीत उत्तर दिलंय. कलाकार म्हणून ट्रोल करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी मानसिकरित्या तयार राहण्याची गरज असल्याचं ती म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kumkum bhagya fame shikha singh get back who troll her on her nude and breastfeeding viral photo kpw