हल्लीच्या माहिती युगात इंटरनेटचा वापर करून गरजुंपर्यंत पोहचणे अधिक सोपे झाले आहे. समाजातील अशा गरजुंपर्यंत पोहचून त्यांना मदत करण्यासाठी अनेक लोकांकडून ऑनलाईन पैसे जमविण्यात येतात याला ‘क्राऊड सोर्सिंग’ असे म्हणतात. तर जमा केलेले पैसे समाजातील गरजूंना देण्यात येतात याला ‘क्राऊड फंडींग’ असे म्हणातात. बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर याने याच पध्दतीचा अवलंब करून समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात द्यायला सुरूवात केली आहे. ‘केट्टो’ या ‘क्राऊड फंडींग’ पोर्टलद्वारे त्याने मागील एका वर्षात ४५ लाखापेक्षा जास्त रक्कम उभारली आहे. हे पोर्टल वेशा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलींचे पुनर्वसन आणि गरीब खेळाडूंना मदत करण्याचे कार्य करते. हल्ली अनेक लोकांना समाजाल मदत करण्याची भावना असून, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हा उत्तम मार्ग असल्याचे कुणाल म्हणाला.
शिवा केशवन या खेळाडूसाठी ‘क्राऊड फंडींग’च्या माध्यामातून कुणालने १० लाख रुपये जमवले. याशिवाय वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका स्त्रीच्या मुलीला अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी ‘क्राऊड फंडिंग’च्या माध्यमातून आर्थिक मदत केली. गेल्या वर्षभरात १८ सामाजीक कार्यासाठी ४५ लाखापेक्षा जास्तिचा निधी उभारण्यात आला असल्याचे या कामातील कुणालचा भागीदार वरुण सेठ ने सांगितले. ज्यात शिक्षण, बालक आणि स्त्रियांच्या सबलिकरणाचा सहभाग आहे.
आपल्या प्रसिध्दीचा वापर करून कुणाल निधी उभारतो. याशिवाय मोठ्या कंपन्यांकडून सहाय्य मिळवत मार्केटिंगची बाजू सांभाळतो. तो ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून देखील काम पाहत असल्याचे देखील सेठने सांगितले.
समाज कार्यासाठी निधी देणाऱ्या लोकांचा ऑनलाईन समूह वरुण आणि कुणालला तयार करायचा असून, खास करून तरुणांना सामाजीक कार्यात क्रियाशील करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
या दोघांनी ‘केट्टो’च्या रूपाने सामाजीक कार्यासाठी निधी पुरविणाऱ्या सामाजीक संस्थांना मदत करणारा मंच उभारला आहे. अलिकडेच ते कोलकतामध्ये दुर्लक्षीत बालकांसाठी निधी उभारण्यासाठीच्या डिनरला उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
कुणाल कपूरने उभारले ‘क्राऊड सोर्सिंग’च्या माध्यमातून ४५ लाख रुपये
हल्लीच्या माहिती युगात इंटरनेटचा वापर करून गरजुंपर्यंत पोहचणे अधिक सोपे झाले आहे. समाजातील अशा गरजुंपर्यंत पोहचून त्यांना मदत करण्यासाठी अनेक लोकांकडून ऑनलाईन पैसे जमविण्यात येतात
First published on: 24-02-2014 at 03:15 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunal kapoor raises 45 lakh through crowd sourcing