Video : कुणाल खेमूच्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर प्रदर्शित

खळखळून हसायला लावणारा ‘लुटकेस’चा ट्रेलर

‘गोलमाल 3′,’कलियुग’ या सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता कुणाल खेमू लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लुटकेस’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुणालने सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर करत ही माहिती दिली.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता चित्रपट प्रदर्शनाची ओढ लागली आहे. या चित्रपटात अभिनेता कुणाल खेमू मुख्य भूमिकेत झळकणार असून हा कॉमेडी चित्रपट असल्याचं दिसून येत आहे.

या चित्रपटाची कथा एक पैशाने भरलेल्या बॅगभोवती फिरत असल्याचं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून लक्षात येत आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट डिझ्नी हॉटस्टारवर ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कुणालसोबत रसिका दुगल, रणवीर शौरी, विजय राज हे कलाकार झळकणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kunal khemu starrer lootcase trailer release ssj

ताज्या बातम्या