जगप्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या लेडी गागाने आजवर तिच्या गाण्यांमधून रसिकांना वेड लावलं आहे. मात्र नुकत्याच ओपरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत लेडी गागाने आयुष्यातील काही धक्कादायक घटनांचा खुलासा केलाय. लेडी गागाने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबद्दल भाष्य केलंय.
पॉप सिंगर लेडी गागाने ओपरा विन्फ्रेच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये लेडी गागाने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचारावर पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला. ती म्हणाली, ” मी १९ वर्षांती होती. एक प्रोड्युसर मला म्हणाला, कपडे काढ. मी नाही म्हंटलं आणि तिथून निघून जात होते. माझे सर्व म्युझिक अल्बम जाळून टाकतील अशी धमकी त्यांनी दिली आणि ते थांबले नाही. त्यांनी मला विचारणं सुरूच ठेवलं मी एकदम स्तब्ध झाले नंतर काय घडलं मला तर काही आठवतही नाही.”
कारण माझ्यावर लैगिंक अत्याचार झाला होता
पुढे लेडी गागा म्हणाली, ” आधी मला असह्य वेदना झाल्या नंतर मी सुन्न झाले. त्यानंतर मी अनेक आठवडे मी आजारी होते. मी माझ्या पालकांसोबत घरी असतानाही प्रत्येक आठवड्याला मला वेदना होत होत्या. मग माझ्या लक्षात आलं या तशाच वेदना आहेत जेव्हा त्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला आणि मी गरोदर असताना मला एका कोपऱ्यात टाकून दिलं. कारण माझ्यावर लैगिंक अत्याचार झाला होता. मी काही महिन्यांसाठी एका स्टुडीओत कैद होते.” असा धक्कादायक खुलासा लेडी गागाने या शोमध्ये केला आहे.
View this post on Instagram
माझ्या शरीराने त्या वेदना भोगल्या होत्या
या घटनेमुळे लेडी गागाला काही वर्ष मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता.ती म्हणाली, ” काही वर्ष मी खूप वेगळी मुलगी होते. माझ्यावर जेव्हा बलात्कार झाला त्यावेळी जाणवलेल्या वेदवा मला सतत जाणवत राहिल्या. मी खूप एमआयआर आणि स्कॅन केले पण डॉक्टरांना काहीच आढळून आलं नाही. पण माझ्या शरीराने त्या वेदना भोगल्या होत्या.” असं ती म्हणाली.
लेडी गागा लवकरच ‘हाउस ऑऱ गूची’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लीक झाले होते. याच लेडी गागा व्हाईट गाउनमध्ये वधूच्या वेशभूषेत दिसत होती. त्यामुळे लेडी गागाने लग्न केलं अशा अफवा उडाल्या होत्या.