लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी..

अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची थेट कबुली देणार.

लागिर झालं जी
लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी…अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी थेट कबुली देणार आहे. टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे ‘लागिर झालं जी’चे अजिंक्य आणि शीतल यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत आहे. दोघांनीही आपण एकमेकांना आवडत असल्याची मूक कबुली दिली. दोघांमध्ये प्रेमळ नोकझोक देखील होताना दिसली. पण अजूनही दोघांनी एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाही. त्यामुळे आता शीतलने ठरवलं की अजिंक्यला आपल्या मनातली भावना उघडपणे सांगायची. शीतल पवारने एखादी गोष्ट ठरवली की मग ती झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे शीतलचा प्रपोजसुद्धा तिच्यासारखाच लाखात एक होणार आहे. चक्क आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन शीतल अजिंक्यला प्रपोज करणार आहे. येत्या सोमवार ते बुधवारच्या भागात आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेली शीतल आणि अजिंक्यला प्रपोज करण्याची तिची धडपड आपल्याला पाहायला मिळेल.

वाचा : सई ताम्हणकरचा बोल्ड लूक

शीतल आणि अजिंक्यला एकमेकांच्या मनातली भावना ठाऊक आहे. पण केवळ प्रेम असून उपयोग नसतो तर ते शब्दांत व्यक्तही करावं लागतं. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून कमिटमेंट घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असं शीतलच्या मैत्रिणींनी तिला सांगितलं. शिवाय प्रपोज नेहमी मुलानेच का करावा? मुलीच्या मनात प्रेम आहे तर तिने ते व्यक्त करायला हरकत काय आहे? असा सल्ला देत यास्मिननेसुद्धा शीतलसोबत पैज लावली की अजिंक्यच्या आधी शीतलने त्याला प्रपोज करावं.

वाचा : सैफ इनायापासून तैमुरला ठेवतोय दूर!

एनएसएस कॅम्पच्या निमित्ताने आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचलेली शीतल अजिंक्यला शोधून काढते आणि सगळ्या ट्रेनिंग सेंटरसमोर अनोख्या पद्धतीने अजिंक्यला प्रपोज करते. पण शीतल पाठोपाठ हर्षवर्धन आणि जयश्रीसुद्धा आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचतात. शिवाय घरामध्ये नाना शीतलचं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवतात. अशा परिस्थितीत शीतल आणि अजिंक्यमधली ही प्रेमाची कबुली कशी होणार याची एक निराळी उत्सुकता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lagira zhala jee sheetal propose to ajinkya in army training school