‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्यानेच सुरू झालेली मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ सध्या प्रेक्षकांना आवडत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना पुढच्या भागात काय होणार याची कायमच उत्सुकता लागलेली असते. आता ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेच्या पुढच्या भागात काय दिसणार, याची झलक झी मराठी वाहिनीच्या अधिकृत अकाउंटवर प्रदर्शित केली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये आपल्या बहिणीचे लग्न मोडल्यामुळे सूर्या फार नाराज असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी त्याची बालपणीची मैत्रीण तुळजा त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी त्याला त्यांच्या बालपणीच्या आवडत्या ठिकाणी घेऊन येते आणि ती त्याला म्हणते, “आपल्या बालपणीच्या आठवणी मॅजिक आहेत. किती छान दिवस होते ना? आपण किती आनंदात राहायचो आणि हाच आनंद मला आता तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. असंच हसत खेळत राहा, छान दिसतोस. आता अजिबात उदास राहायचं नाही. कधी तुला हरल्यासारखं, खचल्यासारखं वाटलं तर मला फोन करायचा, म्हणजे मी तुला इथे घेऊन येईन.” तुळजाच्या या बोलण्यानंतर सूर्या आनंदाने हो म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा: अभिषेक बच्चन सुहाना खान अन् अगस्त्य नंदासह फिरायला पडला बाहेर; कारचे ऐश्वर्या रायशी आहे खास कनेक्शन

‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सध्या वेगळे वळण घेताना दिसत आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला असून पुढे काय होणार याची झलक पाहायला मिळत आहे. तुळजाने सूर्याला माझे लग्न माझ्या मनाविरुद्ध होत असल्याचे सांगितले होते. तिला हे लग्न करायचे नसून तिच्या वडिलांच्या दबावामुळे हे लग्न करावे लागत असल्याचे म्हटले होते. तिला आवडणाऱ्या मुलाबरोबर लग्न करायची इच्छा असल्याचे तिने सूर्याला सांगितले होते. याबरोबरच, तू हे लग्न थांबवशील का? असा प्रश्नदेखील ती विचारते, त्यावर सूर्या होकार देतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोमोमध्ये काय दाखवले आहे?

आता त्यानंतर सूर्या आणि तुळजा मिळून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या मालिकेत पाहायला मिळत आहे. येणाऱ्या भागात तुळजाबरोबर ज्याचे लग्न ठरले आहे, त्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न सूर्या आणि तुळजा करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तुळजाचे वडील म्हणजे डॅडी तुळजा आणि त्या मुलाला टेरेसवर गप्पा मारण्याचे सूचवतात, तेव्हा सूर्या पायऱ्यांवर तेल ओततो. त्यानंतर तो मुलगा पायऱ्यांवरून घसरून पडतो आणि त्याची मान दुखावते. त्यावेळी सूर्या मान व्यवस्थित करण्याच्या निमित्ताने त्याला पुन्हा त्रास देताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता येणाऱ्या भागात काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबरोबरच सूर्याच्या मनात तुळजाविषयी असलेल्या भावना तो व्यक्त करू शकणार का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरणार आहे. या मालिकेत सूर्याच्या भूमिकेत नितीश चव्हाण आणि तुळजाच्या भूमिकेत दिशा परदेशी यांनी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. याबरोबरच सूर्या आणि त्याच्या बहिणीचे नातेदेखील प्रेक्षकांना भूरळ घालत असल्याचे दिसत आहे.