बाप्पाच्या आगमनामुळे राज्यभरात सगळीकडेच सध्या मंगलमय वातावरण आहे. गणरायाच्या येण्याने अनेक मंडळी एकमेकांशी नव्याने जोडली जातात. तसेच बाप्पा विघ्नहर्ता असल्याने त्याच्या येण्याने भक्ताच्या आयुष्यातील सगळी विघ्नं, चिंता दूर होतात. प्रत्यक्ष जीवनाबरोबरच छोट्या पडद्यावरील मालिकांमधील विघ्नं दूर व्हावीत या उद्देशाने अनेक मालिकांमध्येही बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम्, राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. गणपतीच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यातील चिंता आणि संकट दूर होणार आहे.

मालिकेमध्ये मोठ्या संकटाना पार करून खूप अडचणीना सामोरे जात लक्ष्मीचे लग्न मल्हारसोबत झाले होते. परंतु तो तिला स्वीकारू शकला नाही कारण त्याचे आर्वीवर जीवापाड प्रेम आहे. आता मालिकेमध्ये गणरायाचे आगमन होणार असून मल्हार बाप्पाला मोठ्या थाटा माटात आपल्या घरी घेऊन येताना दिसणार आहे आणि त्याच्या साथीला असणार आहे त्याची बायको म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मी घराची सून म्हणून गणरायाचे स्वागत करणार आहे. बाप्पाच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागेल का? ते सुख नक्की काय असेल अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मालिकेच्या पुढच्या भागात मिळणार आहेत. सायंकाळी ७ वाजता असणारी ही मालिका म्हणजे अनेक रसिकांच्या गळ्यातील ताईत असून त्याची कथा पुढे सरकण्यासाठी गणरायांची नक्कीच मदत होईल असे म्हणायला हरकत नाही.

गणरायाच्या आगमनासाठी लक्ष्मी खूप सुंदर अशी नटली असून तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे, गजरे, नथ हातामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घातला आहे. गणपतीच्या आगमनाने लक्ष्मी मल्हारच्या आयुष्यातील सगळी दु:ख, संकट मिटून जाऊन त्यांचा संसार सुखी होईल का ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेचा गणपती विशेष भाग संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.