Premium

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने काल निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या.

sulochana latkar died
सुलोचना दीदी यांचं निधन, वयाच्या ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने काल निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज (५ मे) रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कलाकारांसह अनेक नेते मंडळी सुलोचना दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 18:17 IST
Next Story
‘दंगल’ चित्रपटापूर्वी सान्या मल्होत्राला मिळाला होता सर्जरी करण्याचा सल्ला; अभिनेत्री म्हणालेली, “भावा…”