भारतरत्न व स्वर कोकिळा म्हणून साऱ्या जगात ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ दिवंगत गायिका लता मंगेशकर या आज आपल्यात नाहीत. परंतु त्यांची गाणी आजही आपल्या सगळ्यांच्या ओठांवर असतात. हिंदीसह इतरही बऱ्याच भाषांमध्ये गाणी लतादीदी यांनी म्हंटली आहेत, चित्रपट अल्बम्ससाठी त्यांनी गाणी गायलीच पण याबरोबरीनेच त्यांनी भक्ती संगीतालाही तितकंच महत्त्व दिलं. अगदी शेवटच्या दिवसांतही लतादीदी यांची भक्तीगीतांसाठी ओढ कायम होती.

अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी लतादीदी यांनी काही भजन आणि श्लोक रेकॉर्ड केल्याचंही नुकतंच समोर आलं आहे. सुभाष झा यांच्या खात्रीशीर सूत्राने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी यांनी त्यांच्या अखेरच्या दिवसांत उभं राहायला त्रास होत असूनसुद्धा ही भजनं रेकॉर्ड केली.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण

आणखी वाचा : ‘मिशन राणीगंज’च्या कमाईत अनपेक्षित वाढ; दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार लतादीदी यांनी संगीतकार मयूरेश पै यांना बोलावून राम मंदिरासाठी काही निवडक भजनं आणि श्लोक यांच्या रेकॉर्डिंगची कल्पना दिली. जानेवारी २०२४ मध्ये जेव्हा या मंदिराचा उद्घाटन होईल तेव्हा ही भजनं तिथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना ऐकायला मिळावीत अशी लतादीदी यांची इच्छा होती.

६ फेब्रुवारी २०२२ रोजी ९२ व्या वर्षी लता मंगेशकर नावाचं संगीतक्षेत्रातील एक पर्व संपलं, पण आजही लतादीदी त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्यातच आहेत व कायम असतील. जानेवारीमधील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याला काहीच महीने शिल्लक आहेत. आता या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी तिथे लतादीदी यांचे स्वर गुंजणार का ही जाणून घेण्यासाठी सगळेच रसिक व लतादीदी यांचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.