scorecardresearch

Premium

‘मिशन राणीगंज’च्या कमाईत अनपेक्षित वाढ; दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी

चित्रपटाचे बजेट ५५ कोटी आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सरासरी ओपनिंग केली

mission-raniganj-box-office=day2
फोटो : सोशल मिडिया

Mission Raniganj Box Office Collection Day 2: अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या बायोपिकची घोषणेपासूनच जोरदार चर्चा होती. पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे खाणीत अडकलेल्या ६५ कामगारांना वाचवण्यासाठी सरदार जसवंत सिंग गिल यांनी व इतरांनी केलेल्या मदतीवर आधारित हा चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात स्टारकास्टही मोठी आहे. तसेच अनेक थरारक दृश्ये आहेत.

चित्रपटाचे बजेट ५५ कोटी आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सरासरी ओपनिंग केली. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘मिशन रानीगंज’ने पहिल्या दिवशी २.८ कोटी कमावले. चित्रपटाला वीकेंडचा फायदा झाल्यास या दोन दिवसात आणखी चांगला गल्ला जमवता येऊ शकतो असा अंदाज बांधला जात होता. परंतु त्यापेक्षा जास्तच कमाई या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केली आहे.

kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”

आणखी वाचा : सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या सामन्यासाठी पहिला चित्रपटही सोडायला तयार होती संयमी खेर; अभिनेत्रीनेच सांगितला किस्सा

दुसऱ्या दिवशी ‘मिशन राणीगंज’च्या कमाईत ६९% वाढ दिसून आली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ४.७० कोटींची कमाई केली. दोन दिवसांत मिळून या चित्रपटाने आत्तापर्यंत ७.५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘जवान’ प्रेक्षकांना आकर्षित करत असतानाही अक्षय कुमारच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

गेल्या काही वर्षातील अक्षय कुमारच्या इतर चित्रपटांपेक्षा ‘मिशन राणीगंज’ने ठीकठाक कमाई केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केली होती. त्यामानाने ‘मिशन राणीगंज’च्या कमाईचे आकडे कमीच आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्राने केली आहे. यामध्ये कुमुद मिश्रा, रवी किशन, पवन मल्होत्रा, लंकेश भारद्वाज, राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mission raniganj sees 69 percent jump on its second day at box office avn

First published on: 08-10-2023 at 12:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×