कमी वयामध्ये फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरणारी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापूर. ८०-९० च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पद्मिनी कोल्हापूरे यांचा आजपर्यंतचा प्रवास समृद्ध आणि बहारदार करणारा आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पद्मिनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटातून पद्मिनी कोल्हापूरे कलाविश्वामध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटामध्ये त्या गोपिकाबाई यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर पद्मिनी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यामुळे लता मंगेशकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नमस्कार, “माझी भाची पद्मिनी कोल्हापूरे एक उत्तम कलाकार असून पानिपत या चित्रपटामध्ये ती गोपिकाबाईंची भूमिका साकरत आहेत. त्यामुळे पद्मिनीला अनेक आशिर्वाद. त्यासोबतच आशुतोष आणि त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं.

वाचा : Photo : बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींनी दिले सर्वात बोल्ड सीन

दरम्यान, हे ट्विट करत त्यांनी पद्मिनी यांचा एक फोटोही शेअर केला आहे. पद्मिनी कोल्हापूरे यांनी फटा पोस्टर निकला हीरो या चित्रपटामध्ये काम केलं होतं. मात्र त्यानंतर त्या फारशा चित्रपटांमध्ये दिसून आल्या नाहीत. त्यानंतर आता त्या पानिपतमध्ये झळकणार आहेत. ‘पानिपत’ या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे गोपिकाबाई यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. गोपिकाबाई या वाईच्या भिकाजी नाईक रास्ते यांच्या कन्या आणि नानासाहेब पेशवा यांच्या पत्नी होत्या. गोपिकाबाई हुशार होत्या, तशाच करारी आणि हट्टीसुद्धा होत्या. बुद्धिमत्ता, धैर्य, महत्त्वाकांक्षा, स्वतःच्या मोठेपणाची जाणीव, चाणाक्षपणा असे अनेक गुण त्यांच्यात होते. करारी आणि जिद्दी स्त्री म्हणूनच गोपिकाबाईंचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे.