‘धोनीसोबतचे नाते माझ्या आयुष्याला लागलेला डाग’

धोनीसोबतच्या नात्याला पूर्णविराम मिळून बराच काळ लोटला

धोनीसोबतचे माझे नाते जास्त काळ टीकून राहणार नसल्याची मला कल्पना आल्याने हे नाते आयुष्याला लागलेला डाग

भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत एकेकाळी जवळचे नाते असल्याचे दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी राय हिने मान्य केले आहे. मात्र, धोनीसोबतचे नाते आपल्या आयुष्याला लागलेला एक डाग असल्यासारखे वाटत असल्याचे ती म्हणाली. धोनीसोबतच्या नात्याला पूर्णविराम मिळून बराच काळ लोटला पण अजूनही आमच्या नात्याबाबत चर्चा केली जाते, हे माझे दुर्भाग्य असल्याचे लक्ष्मी राय म्हणाली.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लक्ष्मी राय एका वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तपत्रात म्हणाली की, धोनीसोबतचे माझे नाते जास्त काळ टीकून राहणार नसल्याची मला कल्पना आल्याने हे नाते आयुष्याला लागलेला डाग असल्याचे मला वाटते. पण लोकांना अजूनही आमच्या नात्याबद्दल चर्चा करण्यासाठी वेळ आहे याचेच मला आश्चर्य वाटते. प्रत्येक वेळी एखादी वृत्तवाहिनी धोनी आणि माझ्या नात्याबाबतीत सारखी चर्चा घडवून आणते. माझी मुले एकदिवशी हे टेलिव्हिजन पाहतील तर त्यांना काय वाटेल याची मला भीती वाटते, असेही ती पुढे म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Laxmi rai relationship with dhoni