माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बराच हिट ठरला होता. सुरज बडजात्या यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या व्यक्तिरिक्त रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, आलोक नाथ,अनुपम खेर आणि मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित आणि चित्रपटातील टफी डॉग शॉट देण्यासाठी तयार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. माधुरी दीक्षित दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा २८ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते हा व्हिडीओ पाहून भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

gulabi sadi fame singer sanju rathod
जगभरात धुमाकूळ घालणारं ‘गुलाबी साडी’ गाणं कधी लिहिलं? जळगावचा संजू राठोड म्हणतो, “दिवाळीच्या दिवशी…”
abhijeet kelkar post for ssc topper Prachi Nigam who trolled for her facial hair
चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल झालेल्या प्राची निगमला ‘या’ अभिनेत्याने दिला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाला, “मला तुझा अभिमान…”
piyush ranade shares special post for wife suruchi adarkar
सुरुची अडारकरच्या वाढदिवसानिमित्त पियुष रानडेची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला, “तुझ्या प्रेमामुळे…”
Supriya pilgaonkar shared special post on daughter Shriya Pilgaonkar birthday
लेक श्रियाच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया पिळगावकर यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “नेहमीच मला एक…”

माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा व्हिडीओ माधुरीच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘बॉलिवूडचे सोनेरी दिवस’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘आजकालची पिढी कधीच समजू शकणार नाही की लक्ष्मीकांत बेर्डे किती उत्तम अभिनेता होते. भारतीय चित्रपटांतील सर्वात विनोदी कलाकारांपैकी एक.’

आणखी वाचा- Video : …अन् अचानक कियाराला उचलून घेऊन धावू लागला वरुण धवन, पाहा नेमकं काय घडलं

दरम्यान माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. तिने १९८४ साली ‘अबोध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून. सलमान खानसोबत तिचा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट खूपच हिट झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे असलेले रेकॉर्ड आजही अनेक हिट चित्रपटांना तोडता आलेले नाहीत.