प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसंची मुखर्जी त्यांच्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आके आहेत. लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी त्याने ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब केला आहे त्यामुळे ते ट्रोल झाले आहे. सब्यसाचीने त्यांच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्राचा फोटो शेअर केला आहे. फॅशन डिझायनरच्या मॉडेलने डेनिम आणि ब्रा परिधान करून फोटो सेशन केले आहे, जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडले नाहीत. आता यामुळे डिझायनर सब्यसाचीला कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणी धाडली नोटीस?

वकील आशुतोष दुबे, कायदेशीर सल्लागार, भाजप-महाराष्ट्र (पालघर जिल्हा) यांनी ही नोटीस पाठवली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबद्दल पोस्ट केली आहे. “मी सब्यसाची मुखर्जी या भारतीय फॅशन डिझायनरला “मंगळसूत्र” पवित्र हिंदू विवाहाचा भाग असल्याने “मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेल वापरण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावली आहे. “

( हे ही वाचा: Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” )

( हे ही वाचा: डिझायनर सब्यसाचीच्या मंगळसूत्राच्या नवीन जाहिरातीवर लोक संतापले, म्हणाले “मंगळसूत्र आणि कामसूत्र…” )

सब्यसाचीच्या लक्झरी लेबलने रॉयल बंगाल मंगळसूत्र इंटिमेट फाइन ज्वेलरी कलेक्शन लॉंच केले आहे. मंगळसूत्राची किंमत १ लाख ६५ हजार रुपयांपासून सुरू आहे. सब्यसाचीने त्याच्या इंस्टाग्रामवर मंगळसूत्रची जाहिरात करत फोटो शेअर केले आणि ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र’ असं कॅप्शनमध्ये लिहिले. या जाहिरातीत एका महिलेने ब्रा आणि मंगळसूत्र घातले आहे, तर पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपला जीवनसाथी बनवतो. पवित्र नातं दिसू नये म्हणून काळे मोतीही घातले जातात. मात्र सब्यसाचीने ज्या पद्धतीने ते सादर केले ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legal notice to designer sabyasachi due to that advertisement of mangalsutra ttg
First published on: 30-10-2021 at 12:11 IST