सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड येईल हे सांगता येत नाही. या ट्रेंडसोबतच अनेक नवनवीन चॅलेंज देखील सोशल मीडियावर येत असतात. हे चॅलेंज पूर्ण करण्याचा सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वचजण प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका चॅलेंजने हॉलिवूडपासून ते मराठी कलकारांपर्यंत सर्वांनाच वेड लावले आहे.
या चॅलेंजमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे फोटो कसे असायला हवेत? प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुमचा प्रोफाइल फोटो वेगवेगळा आहे की एकच आहे? हे एका फोटोद्वारे सांगण्यात येत आहे. LinkedIn, Instagram, Facebook, Tinder अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे तुमचे प्रोफाइल फोटो एकाच ठिकाणी कोलाज करुन ते पोस्ट करण्यात येत आहेत. हा फोटो पोस्ट करत #linkedinfacebookinstagramtinder हा हॅशटॅग वापरण्यात येत आहे.
सुरुवातीला हा ट्रेंड हॉलिवूडमध्ये आला होता. आता तो हळूहळू बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत येऊन पोहोचला आहे. इतकच नव्हे तर या फोटोंचे मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे.
या ट्रेंडची सुरुवात हॉलिवूड अभिनेत्री डॉली पार्टन हिने शेअर केलेल्या फोटो कोलाजवरुन झाली. तिने फोटो शेअर ‘ Get your woman who can do it all’ असे कॅप्शन दिले.
त्यानंतर अभिनेत्री जॅनेट जॅक्सनने देखील हे चॅलेंज पूर्ण केले. पण तिने टिंडरसाठी निवडलेला फोटो पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली.
त्यानंतर बॉलिवूडमध्येदेखील हा ट्रेंड सुरु झाला. अभिनेत्री करीना कपूरच्या फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत चॅलेंज पूर्ण केले आहे.
View this post on Instagram
अभिनेता आयुषमान खुरानाने देखीले हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याने तर त्याच्या फेसबुक प्रोफाइलसाठी तर लहानपणीचा फोटो निवडला आहे.