सेन्सॉर बोर्डामुळे अडचणीत आलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा अखेर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. वादात अडकलेला हा सिनेमा आता येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित हा सिनेमा जगभरात विविध ठिकाणी प्रदर्शित केल्यानंतर आता निर्माते हा सिनेमा भारतात प्रदर्शित करणार आहेत.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

याबाबत आनंद व्यक्त करताना अलंकृता म्हणाली की, ‘सेन्सॉर बोर्डसोबत साधारण ६ महिने झालेल्या संघर्षानंतर आता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यांच्या जीवनावर मी हा सिनेमा तयार केला आहे, हा विजय त्या महिलांचा आहे. आता सिनेमाच्या प्रदर्शनानंतर यावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांची मला अधिक उत्सुकता आहे. हा सिनेमा २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे’.

सीबीएफसीच्या प्रमाणपत्र न देण्याच्या निर्णयाविरोधात सिनेमाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव आणि निर्माते प्रकाश झा यांनी एफसीएटीकडे अपील केले होते. सीबीएफसीने या सिनेमाला प्रमाणपत्र न देऊन चुकीचे काम केले असे न्या. मनमोहन सरिन यांनी स्पष्ट केले. सिनेमात वापरण्यात आलेली असभ्य भाषा आणि काही दृश्य हा त्या सिनेमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे सिनेमात देहविक्री करणाऱ्यांसाठी ज्या शब्दांचा वापर करण्यात आला त्या शब्दांना म्यूट करण्याचे आदेश ट्राब्यूनलने दिले होते. त्यानंतरच सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आलं होतं.

VIDEO: राणा डग्गुबतीच्या आगामी चित्रपटाचा दमदार टिझर पाहिलात का?

हा सिनेमा चार महिलांच्या आयुष्याभोवती फिरतो. नित्यनेमांची कामं करून, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक- शाह, अहाना कुमरा आणि प्लाबिता बोरठाकुर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पिरीट ऑफ एशिया अवॉर्ड आणि मुंबई चित्रपट महोत्सवात लैंगिक समानतेसाठी बनलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरविण्यात आले होते.