बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन हिने तिचा प्रियाक दिनो लालवानी याच्याशी विवाह केला. जवळपास गेली एक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात झळकलेल्या लिसाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून आपल्या होणा-या नव-याचा फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली होती. दिनो लालवानी या आपल्या प्रियकरासोबतचा फोटो तिने शेअर केला होता. त्यात ती दिनोला किस करताना दिसली होती. त्यास तिने, याच्यासोबत मी लग्न करतेय, असे कॅप्शन दिलेले. ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लिसा आणि दिनोचा विवाहसोहळा पार पाडला.

चेन्नईत जन्मलेल्या लिसाने तिचे बहुतेक आयुष्य भारताबाहेरच काढले आहे. मुंबईत मॉडेलिंगमध्ये करियर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली. दिनो हा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश उद्योजक गुल्लू लालवानी यांचा मुलगा आहे. २००८ साली त्याने बिनॅटोन टेलिकॉम या त्याच्या वडिलांच्या कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारलेले. याआधीही लिसाने आपल्या प्रियकरासोबतचे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते.

‘हाऊसफुल्ल ३’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘रास्कल्स’ आणि ‘आयशा’ या चित्रपटांमध्ये लिसाने काम केले आहे.