बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतात. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरही होतेय. काही दिवसांपूर्वीच जेंडर बदलून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदे, तेहसीन पुनावाला आणि शिवम शर्मा यांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा केला होता. आता सारा खानचा पूर्वाश्रमीचा पती अली मर्चंटने एक मोठा खुलासा केला आहे.

अली मर्चंटने ‘लॉक अप’मध्ये नुकतीच एण्ट्री केली आहे. तर सारा आणि अलीची भेट ‘बिग बॉस ४’ मध्ये झाली होती. लॉक अपमध्ये पायल रोहतगीसोबत बोलत असताना अलीने ‘बिग बॉस’मध्ये सारासोबत लग्न करण्याविषयी आणि दिल्लीच्या क्लबमध्ये भेटलेल्या मुलीसोबत राहून त्याने साराची कशी फसवणूक केली या विषयी सांगितले.

आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का

पायलने अलीला २०१० मध्ये ‘बिग बॉस’मध्ये लग्नानंतर त्याच्या आणि सारा यांच्यात नक्की काय झालं आणि ते कसे विभक्त झाले या विषयी विचारलं. तेव्हा अली म्हणाला, “बिग बॉसमध्ये जाण्याआधी दोन वर्ष आम्ही लिव्हइनमध्ये राहिलो होतो. तेव्हा मी खूप लहान म्हणजेच २३ वर्षांचा होतो. त्यावयात बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. रिअॅलिटी शोमध्ये लग्न करणारी आमची पहिली जोडी असेल आणि हे कायम लोकांच्या लक्षात राहिल, असे मला वाटले होते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात, तेव्हा ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. आम्हा दोघांचे लग्न झाले आणि काही काळानंतर मी ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलो. मी शोमधून बाहेर आल्यानंतर मला कळले की आमच्या दोघांच्या कुटुंबांमध्ये अनेक अंतरगत समस्या सुरु आहेत. मला काही कळतं नव्हतं. त्याच काळात तिचं नाव शोमधील स्पर्धक अश्मित पटेलसोबत जोडण्यात आले होते.”

आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?

साराची फसवणुकी करण्याविषयी अली म्हणाला, “त्यानंतर मी दिल्लीला गेलो असताना, क्लबमध्ये मी एका मुलीला भेटलो, आम्ही फोनवर बोलू लागलो. त्यानंतर आम्ही भेटलो आणि मी वाहून गेलो पण नंतर मला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला.”

आणखी वाचा :हास्यजत्रेच्या तिसऱ्या एपिसोडच्या शूटच्यावेळी प्रेग्नेंसी विषयी कळले आणि…”, नम्रता संभेरावने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे या विषयी सविस्तर सांगत अली म्हणाला, “मला हे सगळं तिला सांगायचं होतं. पण तेव्हा ती शोमध्येच होती. त्याचवेळी ज्या मुलीला मी दिल्लीत भेटलो होतो, ती मुलगी साराच्या मामाच्या संपर्कात आली. त्यानंतर साराच्या मामाने तिला हे सगळं सांगितलं. मी हे सगळ प्रकरण नियंत्रणात आणण्याआधी मीडिया तिथे पोहोचली होती आणि त्यामुळे सगळं काही विस्कळीत झालं. या कारणामुळे आम्ही विभक्त झालो. त्यानंतर काही काळ ओलांडला आणि आम्ही अचानक भेटलो. तिला पुन्हा एकदा माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचे होते पण त्यावेळी मी दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो.”