scorecardresearch

Lock Upp : “मी माझ्या आईच्या घटस्फोटित मैत्रिणीसोबत…”, शिवम शर्माने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत या शोचे सुत्रसंचालन करत आहे.

lock upp, shivam sharma,
बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत या शोचे सुत्रसंचालन करत आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतात. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरही होतेय. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेनं तिच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला होता. तसेच निशा रावलनंही तिच्या घटस्फोटाबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर जेंडर बदलून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदे, तेहसीन पुनावाला आणि आता शिवम शर्माने आता एक धक्का दायक खुलासा केला आहे.

खरंतर या आठवड्यात शिवम शर्मा, करणवीर वोहरा आणि पायल रोहतगी यांची नावे लॉकअपच्या चार्टशीटमध्ये होती. ज्यामध्ये या स्पर्धकांना नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी स्वतःविषयी असलेलं एक डार्क सिक्रेट सांगायचं होतं. अशा परिस्थितीत शिवम शर्माने शोमध्ये बजर दाबून एक धक्कादायक खुलासा केला आहे. शिवमचे त्याच्या आईच्या मैत्रिणीशी शारीरिक संबंध होते आणि ती घटस्फोटित होती, असा धक्कादायक खुलासा केला आहे.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

याविषयी बोलताना शिवम म्हणाला, “एक घटस्फोटितमहिला भाभी माझ्या घराजवळ राहत होती. ती माझ्या आईची मैत्रिण होती. हे घाणेरडं नाही. कारण ती घटस्फोटित होती आणि मला तिला शारीरिक संबंध जीवनात मदत करायची होती. मी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवतो, म्हणून मी व्हाईट सॉस पास्ता त्यांच्या घरी घेऊन जायचो आणि त्यांच्यासोबत बराच वेळ घालवायचा. ही खूप जुनी बातमी आहे कारण साधारण ८-९ वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये असताना हे घडलं होतं.”

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, विनंती करत म्हणाले…

शिवम पुढे म्हणाला, ‘याला ‘प्यार दो प्यार लो’ म्हणतात, कारण जीवन हे दुःखांनी भरलेलं आहे आणि आपण आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’ कंगनाने शिवमला विचारले की, “सारा अली खानसाठी असलेलं प्रेम हे असचं आहे का? यावर नकार देत शिवम म्हणाला, “नाही, तेव्हा मी ‘लहान मुलगा’ होतो. आता मी मोठा झालो आणि आता मी मोठा ‘खोडी’ काढणार.”

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, तहसीन पूनावाला लॉकअपमधून निघून गेला आहे. शो सोडण्यापूर्वी त्याने स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. तेहसीन पूनावालाने सांगितले की, त्याने एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीसोबत रात्र घालवली होती. साईशा शिंदेला लॉकअपमधून वाचवण्यासाठी त्याने हा खुलासा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lock upp shivam sharma reveals he slept with his mothers friend who was a divorcee dcp