‘सुख म्हणजे नक्की काय असतं’,’स्वप्नांच्या पलिकडले’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून अभिनेत्री माधवी निमकर घराघरात पोहोचली. या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. माधवी निमकर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही शेअर करत असते. आता तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

माधवी निमकरच्या हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. माधवी निमकरने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला. या रीलमध्ये तिच्याबरोबर एक मुलगी देखील दिसत आहे. माधवीने ऐश्वर्या रायच्या २६ वर्षे जुना ‘ताल’ चित्रपटातील ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यावर रील बनवली आहे. माधवीने फ्लोरल प्रिंट गाऊन घातला आहे. तसेच तिने पांढऱ्या रंगाचे गॉगल्स देखील घातले आहेत. ती या व्हिडीओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

माधवी निमकर व्हिडीओ शेअर करत लिहिते, “माय फर्स्ट रील विथ माय डार्लिंग.” नेटकऱ्यांनी माधवीचे कौतुक केले आहे. “क्युट”, “किती सुंदर डान्स केला”, “एकदम छान” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर दिल्या आहे.

माधवी निमकर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या शालिनीच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. अभिनेत्री माधवी निमकरने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, तिने साकारलेल्या भूमिकेचे, तिच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

सोशल मीडियावरदेखील अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. माधवी निमकर सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी माधवी अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही शेअर करत असते. अभिनेत्रीच्या फिटनेसचं अनेकदा कौतुक केलं जातं.

माधवी निमकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सगळं करून भागले’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ अशा चित्रपटांमध्ये माधवीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.